शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

शांतता नांदण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: August 24, 2016 00:04 IST

देशात सतत या ना त्या कारणाने शांती भंग करणारे मूठभर असले तरी शांती नांदावी, या मताचे अनेक नागरिक आहेत.

जमाअते इस्लामी हिंद : देशात शांती, मानवता अभियानाला सुरुवातपरतवाडा : देशात सतत या ना त्या कारणाने शांती भंग करणारे मूठभर असले तरी शांती नांदावी, या मताचे अनेक नागरिक आहेत. ही शांती सद्भावना सतत नांदावी यासाठी आपण सर्वांनी अविरत प्रयत्न ठेवणे गरजेचे आहेत. जातीयतेची तेढ निर्माण करून आपली पोळी शेकणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसाला माणूस बनविण्यासाठी कुठलेच पुस्तक किंवा अभ्यासक्रम नाही. ते आत्मसात करूनच माणूसपण मिळत असल्याचे प्रतिपादन उर्दू हिंदी मराठीचे गाढे अभ्यासक रफीक पारणेर यांनी केले.देशभर २१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर २०१६ पर्यंत जमाअते इस्लामी हिंदतर्फे दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह मोठ्या शहरामध्येसुद्धा सद्भावना फेरी, कविसंमेलन आदी कार्यक्रमांचा सहभाग असून त्यानिमित्त परतवाडा शहरात सोमवारी एका पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पत्रपरिषदेला मतीन अचलपुरी, इब्राहिम साहेब अकोट, रफीक सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. समज गैरसमजातून दंगे होतात ते होऊ नये, मानवता जागावी, व्यसने सुटावी आणि आपल्या धर्माच्या शिकवणीचा आदर करीत सर्वत्र शांतता नांदावी, चांगले वातावण तयार होऊन सर्वांनी आनंदात जगावे, यासाठी मोठ्या प्रमाणात कायम प्रयत्न केले जात आहे. सर्वांनी मिळून त्यात सहभाग घेण्याचे आवाहन उपस्थितांनी पत्रपरिषदेत केले.जवळपास तीन कोटी लोकांपर्यंत या पंधरवाड्यात पोहोचण्याचा मानस असून देशभर शांती आणि सद्भावनेचा संदेश देत कार्यक्रम साजरे केले जाणार आहे. तुकोबांची गाथा, मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा संदेश, गीता, कुराणातील ओव्या सांगत एकतेसाठी हा मंच असल्याचे ते म्हणाले. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक मो. जाकीर मतीन अहेमद, अलताफ रहमान, कमर इकबाल, अमिर इंजिनिअर, मो. जुबेर, जुबेर अहेमद खान, फराज अहेमद खान आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)