शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नायगाव रेतीघाटावर ट्रक पेटविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:03 IST

तालुक्यातील नायगाव येथील रेतीघाटाच्या मालकाला खंडणी मागत शुक्रवारी रात्री सात ते आठ इसमांनी रेतीघाटावर हल्ला करून दोन झोपड्या व एक ट्रक पेटवून दिला तसेच शस्त्राचा धाक दाखवित मजुरांना मारहाण करण्यात आली.

ठळक मुद्देमजुरांना मारहाण : घाटमालकास खंडणीची मागणी

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : तालुक्यातील नायगाव येथील रेतीघाटाच्या मालकाला खंडणी मागत शुक्रवारी रात्री सात ते आठ इसमांनी रेतीघाटावर हल्ला करून दोन झोपड्या व एक ट्रक पेटवून दिला तसेच शस्त्राचा धाक दाखवित मजुरांना मारहाण करण्यात आली.नायगाव रेतीघाटचे मालक मंगेश सदाशिवराव हजारे (रा. गोपालनगर, अमरावती) यांना ७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान मोबाइलवरून अज्ञात व्यक्तीने स्वत:चे ‘किंग’ असे नाव सांगून ‘मी तुझ्या रेतीघाटावर गाडी पाठवतो, एक ट्रक भरून दे’ असे सांगितले. यावर मंगेश हजारेने या रेतीघाटाचा मी एकटा मालक नसून, त्यात इतरही भागीदार असल्याचे संगितले. यावर तू ऐकत नसशील, तर तुला पाहून घेईन, अशी धमकी देऊन किंगने फोन बंद केला.यानंतर शुक्रवार, ९ फेब्रुवारी दुपारी १ वाजता मैनुलभाई (रा. तिवसा) हे एमएच २७ एक्स ६५२८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये दोन ब्रास रेती भरून घेऊन जात होते. त्याचवेळी सुदर्शन कटाने या रेतीघाट संचालकाने रॉयल्टीची सात हजार रुपये मैनुलभाई यांच्याकडून घेतले. तेव्हा लगेच सुदर्शन कटानेला फोन आला. सदर व्यक्तीकडून पैसा घेऊ नका. तुझ्या मालकाला पाच लाख तयार ठेवायला सांग. नाही तर तुझ्या मालकाला घाटात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी दिली.या घटनाक्रमात याच दिवशी रात्री १२:३० चे सुमारास या नायगाव रेतीघाटावर तथाकथित किंग नावाच्या व्यक्तीने त्याच्या सात ते आठ साथीदारांसह हल्ला करून घटनास्थळावरील एक ट्रक तसेच मजुरांच्या झोपड्या आग लावून पेटवल्या आणि शस्त्राचा धाक दाखवून धमकावले व खंडणी मागितली. यामध्ये एकूण मुद्देमालासह ३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नोंद आहे. याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत यांच्या मार्गदर्शनात आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.