शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘नवाब’ स्वगृही परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:20 IST

पोहरा-चिरोडी जंगलात गत दोन वर्षांपूर्वी बोर अभयारण्यातून स्थलांतरित असलेला नवाब नावाचा वाघ हा काही दिवसांपासून कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाला नाही.

ठळक मुद्देबोर अभयारण्यात गेल्याचा दावा : उपवनसंरक्षकांनी वरिष्ठांना पाठविला अहवाल

आॅनलाईन लोकमतअमरावती : पोहरा-चिरोडी जंगलात गत दोन वर्षांपूर्वी बोर अभयारण्यातून स्थलांतरित असलेला नवाब नावाचा वाघ हा काही दिवसांपासून कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाला नाही. परिणामी तो स्वगृही परतला असावा, असा दावा वनविभागाने केला आहेत. तसेही वर्षभरापूर्वी तो बोर अभयारण्यात जाऊन परत आला होता, हे विशेष.अमरावतीलगत वडाळी, पोहरा, चिरोडी व मालखेड परिसरातील जंगल हे वैभव आहे. या परिसरात वन्यपशू, प्राण्यांसह वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या विस्तीर्ण जंगलाचे कॅरिडोर असलेले बोर अभयारण्य आणि कळमेश्वर येथून वाघ, बिबट स्थलांतरित होत असल्याचे अनेकदा घडले आहे. यापूर्वी बोर अभयारण्यातून चिरोडी- पोहरा जंगलात आलेल्या वाघिणीने सहा महिने वास्तव्य केल्यानंतर ती परतली होती. मात्र, चार ते साडेचार वर्षाचा असलेल्या नवाबने चक्क दोन वर्षे चिरोडी- पोहरा जंगलात मुक्काम ठोकल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. वनविभागाने नवाबची काळजी घेताना कोणत्याही प्रकारची उणिवा ठेवली नाही. पोहरा- चिरोडी जंगलात त्याच्या वास्तव्याचे ठिकाण, आहाराची काळजी घेताना अन्य वन्यपशुंवरही करडी नजर ठेवली. नवाबच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात महत्वाच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपिंग लावण्यात आले होते. विशेषत: जलाशय परिसर, पानवठे, शिकारीचे स्थळ आदी ठिकाणी कॅमेºयांची त्याचेवर नजर होती.एवढेच नव्हे तर उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे रात्री-अपरात्री पोहरा, वडाळी, चिरोडी जंगलात आस्कमिक भेट देऊन कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे नवाबचे लोकेशन घेत होते. त्यामुळे निसर्गप्रेमींनाही नवाब असल्याबाबत सुखद आनंद होता. परंतु, गत महिन्याभरापासून नवाब कॅमेºयात कैद झाला नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. तो स्थलांतरित वाघ असल्याचे पुन्हा बोर अभयारण्यात परत गेला, असा दावादेखील वनविभागाने केला आहे. त्यानुसार नवाब स्थलांतरित झाल्याचा अहवाल उपवनसंरक्षकांनी वन्यजीव विभागाकडे पाठविला आहे.जोडीदाराच्या शोधात झाले असावे स्थलांतरपोहरा- चिरोडी जंगलात गत दोन वर्षांपासून बिनधास्तपणे रमलेला नवाब वाघाचे वय चार ते साडेचार वर्षे आहे. या वयानंतर वाघ अथवा वाघीण मिलनासाठी जोडीदार शोधतात. त्यामुळे नवाब हा जोडीदाराचा शोधात बोर अभयारण्य, कळमेश्वर येथे स्थलांतरीत झाला असावा, असा ठाम विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. मुळात वाघ हा प्राणी एकटा राहू शकत नाही. तो जोडीदारसाठी भटकंती करतो, असे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांचे म्हणणे आहे.टी-२ म्हणजे नवाब हा वाघ अलीकडे कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये कैद झाला नाही. वडाळी, चिरोडी जंगलातील संपूर्ण कॅमेºयांची तपासणी करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे.- हेमंत मीणाउपवनसंरक्षक, अमरावती.