शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

'नवाब’ ‘कॅटल लिफ्टर’

By admin | Updated: January 19, 2017 00:03 IST

कळमेश्वर-कोंढाळीच्या जंगलातून स्थलांतरण करून पोहरा-मालखेड जंगलात आलेल्या नवाब वाघामुळे अन्य वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत.

वन्यप्राणी सैरभैर : शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारावैभव बाबरेकर अमरावतीकळमेश्वर-कोंढाळीच्या जंगलातून स्थलांतरण करून पोहरा-मालखेड जंगलात आलेल्या नवाब वाघामुळे अन्य वन्यप्राणी सैरभैर झाले आहेत. कातलाबोडीतील वाघीणीचा हा छावा ‘कॅटल लिफ्टींग’मध्ये पारंगत असल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना जंगलात चराईकरिता नेऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. कातलबोडीतील वाघिणीचा दोन ते अडीच वर्षांचा छावा तब्बल १३५ किलोमीटरचे अंतर पार करून पोहरा-मालखेड जंगलात वास्तव्यास आला आहे. तो जंगलात मुक्त संचार करीत असून त्याचे अस्तित्व वनविभागाच्या टॅ्रप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहराच्या सीमेपर्यंत तो फेरफटका मारत असल्याचे त्याच्या पायाच्या आढळलेल्या ठशांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अमरावती-चांदूररेल्वे मार्गावरील जंगलातील नवाबच्या मुक्त संचाराने अन्य वन्यप्राणी अस्थिर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने जंगलात गस्त वाढविली असून या गस्तीदरम्यान जंगलात अन्य वन्यप्राणी बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे. एरवी जंगलात दृष्टीस पडणारी निलगाय, हरिण, रानडुक्करांसह अन्य वन्यप्राणी दिसेनासे झाल्याचे वनकर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वाघ आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जंगलात फिरत असल्याची चाहुल अन्य वन्यप्राण्यांना लागल्यामुळे या प्राण्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शिवाय नवाब हा कातलबोडीत ‘कॅटल लिफ्टर’ म्हणून ओळखला जातो. नवाबने तेथील अनेक जनावरे फस्त केल्याचेही सांगण्यात येत आहे.या जंगलाशेजारी अनेक गावे असून तेथील शेतकऱ्यांकडे पशूधनाची संख्या अधिक आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जनावरांना जंगलात चराईसाठी नेल्यास त्यांच्यावर नवाबकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनावरांना जंगलात चराईकरिता सोडू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. नवाबच्या दहशतीमुळे वन्यप्राणी तुर्तास शांत झाल्याचे दिसत आहे. वनविभाग अलर्ट असून बारीकसारिक हालचाली देखील टिपल्या जात आहेत. हिलटॉप पॉर्इंटजवळचार बिबटअमरावती-चांदूररेल्वे मार्गावरील हिलटॉप पॉईन्टजवळच नवाबच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्याच परिसरात तीन बिबटांचेही वास्तव्य सिद्ध झाले आहे. मंगळवारी वनविभागाला यापरिसरात बिबटांचे तीन छावे दृष्टीस पडले असून त्या परिसरात बिबट मादी असल्याचेसुद्धा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलात जाण्यापूर्वी वनविभागाची पूर्व परवानगी घेणे आता गरजेचे आहे. नवाब वाघाचा जंगलात अधिवास सिद्ध झाला आहे. या वाघाच्या भीतीमुळे जंगलातील अन्य प्राणी दडून बसले असून जंगलातील गस्तीदरम्यान हा अनुभव आला आहे. - एच.व्ही.पडगव्हाणकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी