चुरणी
चुरणी : चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथील लग्नात जोरजोराने बँड वाजविणे नवरदेवासह बँडमालकास महागात पडले. आपत्ती व्यवस्थापन समितीने पोलिसात केलेल्या तक्रारीवरून चिखलदरा पोलीस ठाण्यांतर्गत काटकुंभ पोलीस चौकीत नवरदेवासह बँडमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ३ मे रोजी घडली.
दहेंद्री ग्रामपंचायत येथील सचिव चेतन राठोड यांनी लग्न समारंभातील बँड वाजवण्यासह नाचणाऱ्यांना मज्जाव केला. मात्र, कुणीही ऐकायला तयार नव्हते. अखेर काटकुंभ पोलीस चौकीमध्ये नवरदेव व बॅंड संचालक राजेश झारखंडे (रा. बामादेही) यांच्यावर भादंविचे कलम १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास गजानन भारती, रुपेश शिंगणे व पवन सातपुते करीत आहेत.