लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीच्या संसद परिसरात श्वसनासाठीचा मास्क लावून कोरोनाबाबत जागरूकता निर्माण केली. कोरोनाच्या बचावासाठी अत्यावश्यक असलेला मास्क देशभरातील शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध करवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी नोंदविली.मास्क तोंडाला लावून त्या संसद परिसरात फिरल्या. भारतात हळूहळू कोरोनाचा संचार दिसू लागला आहे. कोरोनासाठी आवश्यक असलेला मास्क १२५ रुपयांना विकत मिळतो. 'हातावर कमवून पानावर खाणाऱ्या' भारतातील नागरिकांना हा मास्क विकत घेणे शक्य होणार नाही. भारतातून सदर मास्क चीनला पुरविला जातो आहे. भारतात ऐनवेळी गरज पडल्यास हा मास्क आम्हा भारतीयांसाठीच उपलब्ध असणार नाही.काळाची पाऊले ओळखून देशभरात या मास्कचा सर्वत्र मुबलक साठा उपलब्ध असावा. शासकीय रुग्णांलयात त्याची साठवण केली जावी. नागरिकांना तो मोफत उपलब्ध करवून द्यावा. या मास्कचा चीनला केला जाणारा पुरवठा लागलीच थांबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.
मास्क लावून नवनीत राणा यांनी केली कोरोनाबाबत जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST
मास्क तोंडाला लावून त्या संसद परिसरात फिरल्या. भारतात हळूहळू कोरोनाचा संचार दिसू लागला आहे. कोरोनासाठी आवश्यक असलेला मास्क १२५ रुपयांना विकत मिळतो. 'हातावर कमवून पानावर खाणाऱ्या' भारतातील नागरिकांना हा मास्क विकत घेणे शक्य होणार नाही. भारतातून सदर मास्क चीनला पुरविला जातो आहे. भारतात ऐनवेळी गरज पडल्यास हा मास्क आम्हा भारतीयांसाठीच उपलब्ध असणार नाही.
मास्क लावून नवनीत राणा यांनी केली कोरोनाबाबत जागृती
ठळक मुद्देमागणी : अत्यावश्यक मास्क मोफत उपलब्ध करवून द्या