शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नवीनचंद्रनेच केली स्वाक्षरी

By admin | Updated: May 21, 2017 00:03 IST

महापालिकेने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र घनश्याम भंडारीच्या नावे असताना त्यावर नवीनचंद्रनेच स्वाक्षरी केल्याचा प्रकार तपासात निष्पन्न झाला आहे.

पॉवर आॅफ अटर्नीचा हवाला : घनश्याम भंडारीचे बयाण नोंदविलेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र घनश्याम भंडारीच्या नावे असताना त्यावर नवीनचंद्रनेच स्वाक्षरी केल्याचा प्रकार तपासात निष्पन्न झाला आहे. शनिवारी नवीनचंद्रचा भाऊ घनश्याम भंडारीचे बयाण नोंदविण्यात आले. आपण नवीनचंद्रच्या नावे पॉवर आॅफ अटर्नी केली असली तरी, आपल्यातर्फे त्याने स्वत:चीच स्वाक्षरी करणे अपेक्षित होते. मात्र, नवीनचंद्रने आपल्या नावाचा गैरवापर का केला, याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा दावा घनश्याम भंडारीने केला आहे. शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी घनश्याम भंडारीला चौकशीसाठी पाचारण केले. त्यावेळी दिलेल्या बयाणात नवीनचंद्रची आणखी एक बनवेगिरी उघड झाली. महापालिकेतील नगररचना विभागाच्या सहायक संचालक कार्यालयातील नाहरकत प्रमाणपत्रावर चार पार्लरची बनावट नोंद केल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी दुबे आणि भंडारी या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तथापि घनशाम या लहान भावाच्या नावाचा नवीनचंद्रने गैरवापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अमरावती शहरात व्यवसाय करण्यासाठी, नाहरकत मिळविण्यासाठी आपण नवीनचंद्रला पॉवर आॅफ अटर्नी दिले होते. वेळोवेळी परभणीतून अमरावती येणे शक्य नसल्याने ते दिल्याचा दावा घनश्याम भंडारीने केला आहे. शुक्रवारी रात्री घनशाम भंडारी यांनी परभणीहून थेट कोतवाली ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांनी घनशाम भंडारीची चौकशी करून त्यांचे बयाण नोंदविले आहे. फुलाडींची उलट तपासणीअमरावती : आहे. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री भंडारीच्या गणेश कॉलनीस्थित घरातून जप्त केलेल्या नोटरीची वस्तुनिष्ठता तपासण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात घनश्याम भंडारीच्या भूमिकेबाबत पोलिसांना संशय आहे. दुसरीकडे घनश्याम भंडारी हा गेल्या ११-१२ वर्षांपासून अमरावती शहरात नसल्याने त्याला न सांगताच नवीनचंद्रने हा प्रताप केल्याची शंका पोलिसांना आहे. त्या दिशेने पोलिसांनी चौकशी चालविली आहे. भंडारी व दुबे हे शासकीय दस्ताऐवजाची छेडछाड करत असताना फुलाडी हे लघुशंकेसाठी गेले होते. परत येताना ते दुबेशी हस्तांदोलन करताना सीसीटीव्हीत दिसतात. फुलाडींची ही वागणूक पोलिसाच्या लेखी संशयास्पद आहे. त्यामुळे पोलिसांनी फुलाडींची उलट तपासणी चालविली आहे. मनोरंजनाच्या नावावर नाहरकत देतेवेळी आर्थिक व्यवहार झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. नवीनचंद्रचे जिल्ह्यात तीन व्हिडीओ पार्लरनवीनचंद्र भंडारीच्या मालकीचे शहर व ग्रामीण भागात तीन व्हिडीओ पार्लर आहेत. भाजीबाजारात चंद्रकात व्हिडीओ पार्लर, चांदूरबाजार व मोर्शी अशी तीन ठिकाणी हे पार्लर आहेत. या पार्लरला नाहरकत प्रमाणपत्र आहे किंवा कसे, याचा शोध पोलीस घेणार असून ग्रामीण भागातील या पार्लरची माहिती घेण्यासाठी शहर कोतवाली पोलीस ग्रामीण पोलिसांशी पत्रव्यवहार करणार आहे. दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीतनवीनचंद्र भंडारी व अमित दुबे यांना कोतवाली पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तत्पूर्वी दोघांना २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.- तर सहआरोपी करूहुक्का पार्लरच्या नावावर बनवेगिरीच्या या प्रकरणात महापालिकेच्या नगर रचना विभागाची एकूणच भूमिका संशयास्पद आहे. हुक्का पार्लरच्या परवागनीचा मुद्दा शहरभर गाजत असताना आपण मनोरंजनाच्या नावावर क्लब हाऊसला परवानगी दिलीच कशी, याचे समर्पक उत्तर आपण द्यावे, आपल्या अधिनिस्थ यंत्रणेने यात अर्थकारण केले असेल, तर स्पष्ट सांगावे, अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांनाही याप्रकरणात सहआरोपी करण्याची तंबी तपास अधिकारी लेवटकर यांनी सुरेंद्र कांबळे यांना दिली आहे.मनोरंजनाच्या व्याख्येवर कांबळे निरुत्तरमहापालिकेच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कांबळे यांचे शहर कोतवाली पोलिसांनी बयाण नोंदविले. कांबळे यांच्या स्वाक्षरीने घनशाम भंडारीच्या नावे मनोरंजन या घटकाअंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. त्या अनुषंगाने तपास अधिकारी आर.एस.लेवटकर यांनी कांबळे यांचेकडून मनोरंजनाची व्याख्या जाणून घेतली. एखाद्या डॉन्सबारमध्ये मुली नाचत असतील तर, ते सुध्दा मनोरंजनच असते, मग महापालिकेची मनोरंजनाची व्याख्या नेमकी काय, अशी विचारणा कांबळे यांना करण्यात आली. मात्र, कांबळे त्यावर निरुत्तर झाल्याची माहीती लेवटकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. याबाबत पोलिसांनी शासन निर्णय आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीबाबत कांबळे यांना लेखी खुलासा मागितला आहे. महापालिकेकडूनही चौकशीया अनुषंगाने महापालिकेकडूनही चौकशी सुरु करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात जाऊन बाहेरील व्यक्ती दस्ताऐवजांशी छेडछाड करतात. मात्र, त्यांना कोणीही हटकत नाही. तसेच या गैर प्रकारात अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे किंवा कसे, हे सुध्दा चौकशीदरम्यान तपासले जाणार आहे. त्यामुळे नगर रचना कार्यालयातील कर्मचारी सुध्दा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.