शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

नवदुर्गा सॉ-मिल प्रकरण विधानसभेत

By admin | Updated: January 14, 2017 00:09 IST

वलगाव मार्गावरील नवदुर्गा सॉ-मिलच्या संचालकांनी एकच लाकूड कापण्याच्या परवानगीच्या आधारे अवैध वृक्षतोड केली.

सुनील देशमुखांचा अतारांकित प्रश्न : मुख्य वनसंरक्षकांना माहिती पाठविण्याच्या सूचनाअमरावती : वलगाव मार्गावरील नवदुर्गा सॉ-मिलच्या संचालकांनी एकच लाकूड कापण्याच्या परवानगीच्या आधारे अवैध वृक्षतोड केली. हे अवैध लाकूडकटाईप्रकरण राज्याच्या विधीमंडळात पोहोचले असून आ. सुनील देशमुखांनी यासंंदर्भात अतारांकित प्रश्न सादर केला आहे.अतारांकित प्रश्न क्र. ७३६६१ अन्वये स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवरलाईन नजीकच्या नवदुर्गा सॉ-मिलमध्ये १० ट्रक अवैध लाकूड आढळल्याचे प्रकरण मांडले. येथील जिल्हा स्त्री रूग्णालय परिसरात इमारतीचे नवीन बांधकाम करताना अडथळा ठरणारे वृक्ष कापण्यात आले होते. त्याकरिता महापालिका वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी देखील घेण्यात आली होती. वृक्षकटाईची निविदा काढण्यात आली होती. झाडे कापण्याचे कंत्राट नवदुर्गा सॉ-मिलने घेतले होते. मात्र, डफरीनच्या आवारातील झाडे कापण्यासाठी घेतलेल्या परवानगीच्या आधारेच शहरातील इतर झाडांचीही सर्रास कत्तल केली जात होती. सहा महिन्यांपर्यंत यापरवानगीचा आधार घेऊन नवदुर्गा सॉ-मिलच्या संचालकांनी वनाधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली. मात्र, वनाधिकाऱ्यांनी नवदुर्गा सॉ-मिलमध्ये धाडसत्र राबविले असता चक्क १० ट्रक अवैध लाकूड आढळले होते. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी चौकशी आरंभली. मात्र, काही वनाधिकाऱ्यांनी नवदुर्गा सॉ-मिलच्या संचालकांना ‘सॉफ्ट कार्नर’ देत वनगुन्हे दाखल केले नाहीत. त्यानंतर अवैध लाकूड प्रकरण ‘लोकमत’ने सातत्याने लोकदरबारात रेटून धरले. शहरात कापले गेलेले लाकूड आरागिरणीत आणले जात असेल तर त्याकरिता वाहतूक परवानगीची आवश्यकता नाही. मात्र, सहा महिन्यांपूर्वीच्या परवानगीवर लाकूडकटाई कशी सुरू राहू शकते, ही बाब देखील आ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे. वनविभागात अनागोंदी कारभार सुरु असल्यामुळे अवैध लाकूड प्रकरणाचा अतारांकित प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला आहे. याविषयी सत्यता आता विधानभवनात चर्चिली जाईल.-सुनील देशमुख, आमदार, अमरावती