शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेव मांडवात आलाच नाही!

By admin | Updated: March 22, 2016 00:22 IST

पत्रिका वाटल्या, लग्नाचा दिवस आला, नातेवाईक जमले. मुहूर्तही टळला. मात्र, नवरदेव मांडवात आलाच नाही,...

नवरीने केली पोलिसांत अतिप्रसंग व फसवणुकीची तक्रारअमरावती : पत्रिका वाटल्या, लग्नाचा दिवस आला, नातेवाईक जमले. मुहूर्तही टळला. मात्र, नवरदेव मांडवात आलाच नाही, असा प्रकार रविवारी सायंकाळी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. अखेर नवरदेवाची प्रतीक्षा करणाऱ्या नवरीने राजापेठ पोलिसांत नवरदेवाविरुध्द अतिप्रसंगाचा गुन्हा नोंदविला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. विश्वजीत पाटील (३५, रा.अकोला) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील एक तरुणी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन दिल्ली येथे सुरक्षा विभागात नोकरीला लागली. तेथून ती बदलीवर पुण्याला गेली. तेथे तिची ओळख इंजिनिअर विश्वजीत पाटील नामक तरूणाशी झाली. दोघांमध्ये प्रेमसूत जुळले. शारीरिक संबंधही झाले. त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी २० मार्च ही लग्नाची तिथी निश्चित केली. शहरातील एमआयडीसी मार्गावरील एका मंगल कार्यालयात लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले. वधू-वर पक्षाकडून लग्नसमारंभाची जय्यत तयारी सुरु झाली. अधूनमधून वधू-वरांचा दूरध्वनीवरून प्रेमालापही सुरू होता. नवरी मुलीला लग्नाच्या दिवसाची प्रतीक्षा होती. तो दिवस उजाडला. नवरीकडील सर्व मंडळींनी रविवारी मंगल कार्यालय गाठले. सकाळपासून वरातीची प्रतीक्षा सुरु झाली. दुपारचे १२ वाजून गेल्यानंतरही वरात आली नाही. नवरीने विश्वजीत पाटील याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन ‘नॉट रिचेबल’ होता. वारंवार फोन करूनही असाच प्रकार झाल्याने नवरीच्या कुटुंबाचे धाबे दणाणले. तरीसुध्दा सायंकाळपर्यंत त्यांनी प्रतीक्षा केली. मात्र, नवरदेवाचा पत्ताच नव्हता. हतबल मुलीने सायंकाळी राजापेठ पोलीस ठाण्यात विश्वजीत पाटीलविरुध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६, ४२० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. प्रेमसंब’ंधातून दोघेही लग्न करणार होते. मात्र, नवरदेव लग्नाच्या दिवशी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे मुलीने तक्रार नोंदविली आहे. त्यावरून आरोपीविरुध्द बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.- एस.एस. भगत, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.