शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंबा-एकवीरादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ; पहाटे ५.३० च्या मुहूर्ताला घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:56 IST

विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अंबा-एकवीरादेवी मंदिरात बुधवारी ५.३० वाजताच्या मुहूर्तावर घटस्थापना करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अंबा-एकवीरादेवी मंदिरात बुधवारी ५.३० वाजताच्या मुहूर्तावर घटस्थापना करण्यात आली. यानंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी भाविकांनी अंबा-एकवीरादेवी मंदिरात अलोट गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा कायम होत्या. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.अंबादेवी संस्थानच्यावतीने घटस्थापना व अभिषेकाचा मान यंदा संस्थानचे सचिव दीपक श्रीमाळी यांना मिळाला. श्रीमाळी दाम्पत्याच्या हस्ते अभिषक करण्यात आला. यानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील पहिली महाआरती भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी अंबादेवी संस्थानच्या अध्यक्ष विद्या देशपांडे, सचिव डॉ. अतुल आळशी यांच्यासह ट्रस्टींची उपस्थिती होती.एकवीरादेवी संस्थानात घटस्थापना व अभिषेक संस्थेचे विश्वस्त शेखर कुलकर्णी दाम्पत्याच्या हस्ते झाले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले व सचिव शैलेश वानखडे यांच्यासह विश्वस्त तसेच भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यानंतर दिवसभर विविध मंडळांकडून भजने, इतर आध्यात्मिक कार्यक्रमांसह चारूदत्त आफळे महाराज (पुणे) यांचे कीर्तन पार पडले. अंबादेवी संस्थानात सहा, तर एकवीरादेवी संस्थानात पाच पुजारी सेवेत राहणार आहेत, अशी माहिती डॉ. गोडबोले यांनी दिली आहे.