सचिन मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : येथील एका विवाहाच्या स्वागत समारंभाप्रसंगी निमंत्रित सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नवरदेवाला हेल्मेट भेट दिले. रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गंत जागृतीसाठी हा संदेश प्रसंगानिमित्ताने देण्यात आला.येथील एका ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक इब्राहिम कांगडा यांचे चिरंजीव मोहसीन याचा विवाह रविवारी पार पडला. मंगळवारी येथील एका मंगल कार्यालयात स्वागत समारंभ होता. यावेळी निमंत्रित सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गांजरे यांनी नवरदेवाला गिफ्ट म्हणून हॅल्मेट भेट दिले. जिल्ह्यात २३ एप्रिलपासून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने उपस्थितांमध्ये जागृतीसाठी ही भेट देण्यात आली. अनेकांनी नवरदेवाला पैशांचे पाकीट व भेटवस्तू दिल्यात. पण गांजरे हे याला अपवाद ठरले. हॅल्मेट घातल्याने दुचाकीस्वारांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे हॅल्मेट वापरण्याचा संदेश वाहन चालकांना या उपक्रमातून देण्यात आला. याच समारंभात रस्ता सुरक्षा अभियानाचे फलकसुद्धा नागरिकांच्या माहितीसाठी लावण्यात आले. मोहसीन यांनी देखिल हॅल्मेटचा आनंदाने स्विकार करून आपण याचा नियमित वापर करून, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. यावेळी अकोटचे आ. प्रकाश भारसाकळे, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, भातकुलीचे एसडीओ विनोद शिरभाते, तहसीलदार अमोल कुंभार, ठाणेदार मुकुंद ठाकरे, बाजार समितीचे सभापती बाबाराव बरवट, यांच्यासह तालुक्यातील अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
नवरदेवाला आरटीओंद्वारा हेल्मेट भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:38 IST
येथील एका विवाहाच्या स्वागत समारंभाप्रसंगी निमंत्रित सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नवरदेवाला हेल्मेट भेट दिले. रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गंत जागृतीसाठी हा संदेश प्रसंगानिमित्ताने देण्यात आला.
नवरदेवाला आरटीओंद्वारा हेल्मेट भेट
ठळक मुद्देरस्ता सुरक्षा अभियान : युवकांमध्ये जागृतीसाठी प्रयत्न