शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आयुक्तांसाठी नवी कोरी होंडासिटी

By admin | Updated: October 28, 2016 00:14 IST

महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्यासाठी ८ लाखांचे चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले.

एकाच वर्षात दोन वाहने : जुने वाहन मार्डीकरांकडेअमरावती : महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्यासाठी ८ लाखांचे चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले. एकीकडे महापालिकेची आर्थिक घडी बिघडली असताना प्रशासनाने हा खर्च करायला नको होता, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया उमटली आहे. चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीनंतर हेमंत पवार यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. लगेचच त्यांच्यासाठी ७ लाख ९९ हजार ८५२ रुपये खर्च करून होंडासिटी चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले. तत्कालीन आयुक्तांकरिता जून २०१५ मध्ये नवीन वाहन खरेदी केले होते. ‘ड’ वर्ग महापालिकेची अवस्था पाहता येथे शिक्षकांचे वेतन आणि कर्मचाऱ्यांच्या थकबाकीसाठी प्रशासनाला आर्थिक कसरत करावी लागते. प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या पवारंसमोर वेतन आणि थखबाकीच्या अनुषंगाने निदर्शने- निवेदनांची भरमार असते. अशा परिस्थितीत आयुक्तांनी ८ लाखांच्या वाहन खरेदीला कसे बळी पडलेत. अशा प्रश्न महापालिका वर्तुळात उपस्थित करण्यात आला आहे. महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्थायी समितिने ठराव क्र. १७ अन्वये स्थायी समिति सभापतीसाठी नवीन वाहन खरेदी करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र ११ जून ला स्थायीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी प्रशासनाला पत्र लिहून आयुक्तांकरिता नवीन वाहन घेण्याचे सुचविले व आयुक्तांकडील ते वाहन स्थायी समिती सभापतींना देण्याचे कळविण्यात आले. त्याअनुषंगाने गुडेवार यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले चारचाकी वाहन मार्डीकरांना देण्यात आले व विद्यमान आयुुक्तांसाठी ७.९९ लाख रुपये खर्च करून नवीन वाहन घेण्यात आले, असा दावा कार्यशाळा विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)दालनावर १ लाखांचा खर्च महापालिका आयुक्तांच्या दालनात फर्निचर व सुशोभिकरण्याकरिता १ लाख ४०० रुपए खर्च करण्यात आल्याची माहिती भांडार अधीक्षकांनी दिली आहे. आयुक्तांच्या दालनातील जुन्या खुर्च्याच्या जागा नव्या खुर्चींनी घेतली. आयुक्तांच्या खुर्चीसह दालनातील इतर खुर्च्याही बदलविण्यात आल्या.