शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा, चिरोडी जंगलात निसर्ग सफारी आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:06 IST

शहरानजीकच्या पोहरा- चिरोडी जंगलाचे वैभव, विविध पक्ष्यांसह वन्यप्राणी बघता यावे, यासाठी सोमवार १३ नोव्हेंबरपासून निसर्ग सफारीला प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्देजंगल समृद्धीकडे वाटचाल : लवकरच १२ किमी.चा दुसरा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरानजीकच्या पोहरा- चिरोडी जंगलाचे वैभव, विविध पक्ष्यांसह वन्यप्राणी बघता यावे, यासाठी सोमवार १३ नोव्हेंबरपासून निसर्ग सफारीला प्रारंभ होत आहे. वन विभाग आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचा मानस वनविभागाने व्यक्त केला आहे.पोहरा-चिरोडी जंगलात काही महिन्यांपासून नवाब या वाघाचे वास्तव्य असल्याने हे जंगल अधिक प्रमाणात चर्चेत आले आहे. बिबट, हरिण, नीलगाय, मोर, चितळ आदी वन्यप्राणी बहुसंख्येने असून पक्ष्यांच्या सुमारे ४० प्रजाती येथे असल्याची नोंद वनविभागात आहे. विविध फुलझाडे हे पोहरा-चिरोडी जंगलाचे वैशिष्ट्य असून अनेक प्रजातीच्या फुलपाखरांचा मुक्त विहार येथे आहे. रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी निसर्ग सफारीची संकल्पना पुढे आणली. वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात पोहºयाचे वनपाल विनोद कोहळे, चांदूर रेल्वेचे वनपाल आशिष गावंडे हे निसर्ग सफारीची धुरा सांभाळतील. पोहरा वनविभागाच्या विश्रामभवनातून निसर्ग सफारीला प्रारंभ होईल. पाच किमी.च्या प्रवासात पोहरा येथून चिरोडी, वरूडा टी-पॉर्इंट, वनकुटी ते चिरोडी पुन्हा पोहरा असा मार्गक्रमण राहील. सकाळी ५ ते ७ तर सायंकाळी ४ ते ६ असे निसर्ग सफारीचे वेळापत्रक ठरविले आहे. येत्या काही दिवसांत निसर्ग सफारीचा दुसरा टप्पा प्रारंभ होणार आहे. मालखेड, छत्री तलाव, बोडना कॅम्प पुढे तपोनेश्वर, असा १२ कि.मी.चा मार्गक्रमण राहणार आहे.वाघ, बिबट बघण्याची संधी : वन विभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा उपक्रमवºहाडी जेवणाचा घेता येईल आस्वादपोहरा जंगलात विस्तीर्ण तलाव आहे. या तलाव परिसरात पर्यटकांना वºहाडी जेवणाचा आस्वाद घेता यावा, यासाठी सुशिक्षित बेरोजगार संघटनेला वºहाडी जेवणाचे प्रायोगिक तत्त्वावर कंत्राट सोपविले जाणार आहे. तलाव परिसरात पर्यटकांना लवकरच वºहाडी जेवणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.खासगी वाहनाद्वारे निसर्ग सफारीपोहरा - चिरोडी जंगलात निसर्ग सफारीसाठी वनविभागाने स्वतंत्र वाहन उपलब्ध केलेले नाही. परंतु निसर्ग सफारी पर्यटक, नागरिकांना त्यांच्या खासगी वाहनांनी सफारी करता येईल. त्याकरिता प्रतीवाहन १०० रुपये, तर निसर्ग सफारीसाठी प्रतीव्यक्ती २० रुपये आणि गाईडचे १०० रुपये शुल्क वनविभाग घेणार आहे.पोहरा-चिरोडी जंगलात भरपूर वनसंपदा आहे. वन्यप्राण्यांचेही वास्तव्य ही जमेची बाजू आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी निसर्ग सफारी सुरु होत आहे. पर्यटकांकडून घेण्यात येणारे शुल्क संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केली जाईल.- हेमंत मिणा,उपवनसंरक्षक, अमरावती