शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी पर्वाला आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:47 IST

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २३ ते ३० आॅक्टोबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भावपूर्ण मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम २९ आॅक्टोबरला होणार आहे. यावेळी राज्यातील भाविक मंडळी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील. ३० आॅक्टोबरला गोपालकाला व व्यायाम प्रात्यक्षिक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होईल.

ठळक मुद्दे२९ आॅक्टोबरला मौन श्रद्धांजली : चित्तवेधक रोषणाई, भव्य सभामंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू

लोकमत न्यूज नेटवर्कमोझरी/तिवसा : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सव २३ ते ३० आॅक्टोबरपर्यंत श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रम येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भावपूर्ण मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम २९ आॅक्टोबरला होणार आहे. यावेळी राज्यातील भाविक मंडळी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील. ३० आॅक्टोबरला गोपालकाला व व्यायाम प्रात्यक्षिक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता होईल.सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणाऱ्या श्रीक्षेत्र गुरूकुंज येथे राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे. यावर्षी सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी समारंभ असल्यामुळे भाविकांची गर्दी वाढणार असल्याने मुख्य मंडपाचा विस्तार करण्यात आला आहे. दोन उपमंडप यावेळी तयार करण्यात आले आहेत. या महोत्सवात विविध प्रकारचे सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक, प्रकट मुलाखत, युवक संमेलन, शाहिरी लोकरंग व वादविवाद स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला. या सोहळ्याला लाखो भक्त वाजतगाजत पालखी दिंड्यांसह श्रीक्षेत्र गुरूकुंज येथे येणार असल्याने भव्य मंडप उभारून पालख्यांची व निवासांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यतिथी महोत्सवात दररोज सकाळी ५.३० ते ६.३० या वेळात सामुदायिक ध्यानावर अ‍ॅड. सचिन देव, मंदा देशमुख, विलास साबळे, श्रीमती राजयोगिनी सितादिदी, ज्ञानेश्वरी दिदी, अ‍ॅड. दिलीप कोहळे, सुश्री रामप्रियाजी, प्रकाश वाघ आपले चिंतन व्यक्त करतील. दररोज सकाळी ७ ते ८ या वेळात योगाचार्य रामचंद्र गरड योगासन व प्राणायामचे प्रशिक्षण देणार आहे. शरीर स्वास्थ्य मार्गदर्शन करणार आहे. सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात माणिक येलचेलवार, नलिनी वेरूळकर, विठ्ठलराव काठोळे, एकनाथ राऊत, राम सातेगावकर ग्रामगीता प्रवचन करतील. दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळात सामुदायिक प्रार्थना व प्रार्थनेच्या महत्त्वावर गुलाचंद्र खोब्रागडे, सुभाष सावरकर, सतीश तराळ, प्रा. स्वप्निल इंगोले, पुष्पा बोंडे, प्रवीणसिंह परदेशी, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे आपले मनोगत व्यक्त करतील.मंगळवारी पहाटे ४.३० वाजता तीर्थस्थापनासुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाची सुरूवात २३ आॅक्टोबरला पहाटे ४.३० वाजता तीर्थस्थापना व चरणपादुका पूजनाने होईल. राजेंद्र कठाळे, सुभाष नेमाडे, वासुदेव कुरवाडे, राजेंद्र चव्हाण अखंड वीणा वादनास प्रारंभ करतील. त्यानंतर राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा मानकर स्वामी (आळंदी) यांच्या संयोजनाखाली काढण्यात येईल. दुपारी १२ ते ३ सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवी उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री प्रवीण पोटे, खा. आनंदराव अडसूळ, आ. यशोमती ठाकूर, आ. किर्तीकुमार भांगडीया यांना निमंत्रित करण्यात आले आहे.