संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. मोहन खेरडे आणि पेटेंट व ट्रेडमार्क विभागाचे समन्वयक स्वप्निल गावंडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.आर. तडस होते. आयक्यूएसी समन्वयक कल्पना पवार, परिषदेचे समन्वयक रविकांत महिंदकर, आयोजन सचिव म्हणून रवि धांडे, सहसचिव म्हणून दिनेश पुंड यांनी कामकाज पाहिले. वेबिनारचे उद्घाटन अध्यक्ष प्राचार्य तडस यांनी केले. कल्पना पवार यांनी वेबिनारचे महत्त्व सांगितले. संचालन दिनेश पुंड व आभार प्रदर्शन रवि धांडे यांनी केले. आजच्या माहिती, तंत्रज्ञानाच्या युगात अध्ययन, अध्यापन व संशोधनामध्ये बौद्धिक संपदा अधिकाराचे महत्त्व, कॉपीराईट कायदा, ट्रेड मार्क या विषयांवर डॉ. मोहन खेरडे यांनी अभ्यासपूर्ण मत मांडले. स्वप्निल गावंडे यांनी संशोधकांनी पेटेंटची नोंदणी कशी करावी, याकरिता लागणारी महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. प्राचार्य तडस यांनीही बौद्धिक संपदा अधिकार याविषयी मनोगत व्यक्त केले.
प्राध्यापक व संशोधकांनी पेटेंटची नोंदणी करून संशोधनाचा दर्जा उंचवावा, यासाठी या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५५ प्राध्यापक व संशोधकांनी सहभाग नोंदविला होता. एस.ए. ईखे, नितीन कोळेकर, बी.टी. कुंभारे, एस.पी. बाकडे, जी. बी. हरडे, पुष्पा दहीकर, गिरीश कांबळे, कोहळे यांनी परिश्रम घेतले.