शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात राष्ट्रीय आदिवासी कोरकू सांस्कृतिक महासंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 22:04 IST

राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी बांधवांचे कोरकू महासंमेलन पहिल्यांदा मेळघाटात पार पडले. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगड, झारखंड, आसाम गुजरात, राजस्थानातून आदिवासी बांधव आले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हे महासंमेलन घेण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावरील पहिले आयोजन : विविध प्रकारच्या आदिवासी नृत्य, गायनात रंगले श्रोते

पंकज लायदे ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी बांधवांचे कोरकू महासंमेलन पहिल्यांदा मेळघाटात पार पडले. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तिसगड, झारखंड, आसाम गुजरात, राजस्थानातून आदिवासी बांधव आले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हे महासंमेलन घेण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.भारतीय स्तरावर अनेक परिक्षेत्रात कोरकू समाजाची लोकसंख्या २० लाखांच्या वर असून मेळघाटात सर्वात जास्त आदिवासी कोरकू बांधव राहतात. आधुनिक युगात आदिवासी संस्कृती, भाषा नष्ट होत असल्याचे दिसून येत असल्याने ते टिकविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कोरकू बांधवांनी एकत्र येऊन राष्ट्रीय आदिवासी कोरकू महासंमेलन शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी मेलघाटातील धारणी येथील जिल्हा परिषद हायस्कूल मैदानात आयोजन केले होते. त्या महासंमेलनाचे अध्यक्ष नंदकिशोर पालवे उद्योगपती (पुणे) हे होते. व्यासपीठावर कॉम्रेड वारू दादा सोनवणे (नंदूरबार), सांगल्याभाई वळवी (गुजरात), रामकिसनजी वळवी, माधुरी बहन (मध्यप्रदेश), काशीनाथ ब्रहाटे (परतवाडा) हे उपस्थित होते. यावेळी हजारो आदिवासी बांधवांना आदिवासी संस्कृती टिकविणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे मौलिक विचार नंदकिशोर पालवे यांनी मांडले. आपल्याकडून आजपर्यंत कळत न कळत झालेल्या चुका आपल्या येणाऱ्या पिढीकडून होऊ नये, त्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन आदिवासी संकृतीचे जतन करण्याच्या हे महासंमेलन आयोजित केले आहे. राज्यातील २२ आदिवासी संघटनांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी आ. प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार केवलराम काळे, राजकुमार पटेल, जीप सदस्य दयाराम काळ,े सभापती रोहित पटेल, उपायुक्त रमेश मावस्कर, हिरालाल मावस्कर रमेश तोटे आदी उपस्थित होते.