दिलासा : तीन दिवसांत होणार रक्कम खात्यात जमाअमरावती : खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विमा योजनेची रक्कम अमरावती जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भारतीय कृषी पीक विमा कपंनी, मुंबई यांच्याकडून १ लाख ६१ हजार १३० लाभार्थ्यांना वाटप करण्याकरिता ८३ कोटी ९३ लाख रुपये वितरित करण्यात आलेली आहेत. सदरची रक्कम येत्या तीन दिवसांत पात्र लाभार्थ्यांना वाटप करावी व लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिले आहेत.जिल्हाधिकारी म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची ८३ कोटी ९३ लाख रुपये मंजूर नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्यातील २३ बँकांना लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार १३० लाभार्थ्यांना तीन दिवसांत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात सर्वाधिक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ६८,२४३ लाभार्थ्यांना ४९ कोटी ६ लक्ष रुपये वाटप करावयाचे आहेत. त्या खालोखाल स्टेट बँक आॅफ इंडिया यांना २०,३७५ लाभार्थ्यांना १६ कोटी २५ लक्ष रुपये वाटप करावयाचे आहे.बँकनिहाय लाभार्थी संख्या अलाहबाद बँक २४०२ लाभार्थी (१.३४ कोटी), देना बँक १९२५ लाभार्थी (१.४२ कोटी), सेंट्रल बँक आॅफ इंडिया ९२९६ लाभार्थी (६.२५ कोटी), बँक आॅफ महाराष्ट्र ८३३६ लाभार्थी (५.८९ कोटी), अॅक्सीस बँक १३ लाभार्थी (१.९७ लक्ष), विजया बँक ७ लाभार्थी (६० हजार), विदर्भ कोकण बँक २७७ लाभार्थी (२१.५५लक्ष), युनियन बँक १३४२ लाभार्थी (६४.७७ लक्ष), युको बँक १६९ लाभार्थी (१२.९६ लक्ष), सिंडीकेट बँक १८ लाभार्थी (२.९२ लक्ष), सुरेश कोआॅपरेटिव्ह बँक २ लाभार्थी (५ हजार), स्टेट बँक आॅफ हैद्राबाद ६ लाभार्थी (४५ हजार), पंजाब नॅशनल बँक २२१ लाभार्थी (२३.२६ लक्ष), इंडियन ओहर्सीज बँक ८७ लाभार्थी (१३.६५ लक्ष), इंडियन बँक १५२१ लाभार्थी (१.१८ कोटी), आयडीबीआय बँक ६५ लाभार्थी (४.६३ लक्ष), आयसीआयसीआय बँक १६ लाभार्थी (९९ हजार), कॉरपोरेशन बँक ६९ लाभार्थी (६.६८ लक्ष), कॅनरा बँक ७६ लाभार्थी (९.२६ लक्ष), बँक आॅफ इंडिया ७८६ लाभार्थी (६४.१९ लक्ष), बँक आॅफ बडोदा ७५७ लाभार्थी (४५.२३ लक्ष), रुपये तीन दिवसात वाटप करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
राष्ट्रीय पीक विमा योजना ८४ कोटी रुपये मंजूर
By admin | Updated: July 15, 2015 00:23 IST