शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

लब्धप्रतिष्ठितांसमक्ष महापालिकेचे लोटांगण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:02 IST

गर्ल्स हायस्कूल ते इर्विन रस्त्यावरील दुभाजकावर उभारलेले अनधिकृत युनिपोल ‘जैसे थे’ असल्याने पालिका प्रशासनाची ‘प्रशासकीय लेटलतिफी’ चव्हाट्यावर आली आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर शुक्रवारी बाजार परवाना, बांधकाम आणि एडीटीपीचे संयुक्त पथक मार्किंग करून देणार आहेत.

ठळक मुद्देआज मार्किंग : मालू इन्फ्रास्पेसचे लोखंडी पोल ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गर्ल्स हायस्कूल ते इर्विन रस्त्यावरील दुभाजकावर उभारलेले अनधिकृत युनिपोल ‘जैसे थे’ असल्याने पालिका प्रशासनाची ‘प्रशासकीय लेटलतिफी’ चव्हाट्यावर आली आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर शुक्रवारी बाजार परवाना, बांधकाम आणि एडीटीपीचे संयुक्त पथक मार्किंग करून देणार आहेत. गुरुवारी सायंकाळी आयुक्तांनी बाजार परवानाला तसे आदेश दिलेत.मालू इन्फ्रास्पेसवर कारवाईचा चेंडू बाजार परवानाकडून बांधकामकडे तर बांधकामकडून अन्य विभागाकडे भिरकावल्याने लालफितशाहीचे ते उत्तम उदाहरण ठरले आहे. लब्धप्रतिष्ठातांसमक्ष महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी सपशेल लोटांगण घातले असल्याचे ते द्योतक ठरले आहे.महापालिकेची नोटीस अव्हेरून एक विकसक आयुक्तांनाच आव्हान देतो काय? त्याचे उभारलेले अनधिकृत खांब दोन आठवड्यानंतर ‘जैसे थे’ राहतात तरी कसे? यातून प्रशासनाची सपशेल शरणागती अधोरेखित झाली आहे. आयुक्तांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापूर्वी ज्या करारनाम्याच्या आधारावर उड्या मारण्याचा प्रयत्न होत आहे. तो करारनामा अधिकृत व अवैध असल्याचे सांगण्याचे धारिष्ट्य कुणातही नाही. त्यामुळे पुढील कारवाईसाठी टोलवाटोलव सुरू आहे.बाजार परवाना आपल्या ठिकाणी बरोबर असल्याचा दावा करताना बांधकाम विभागाने करारनामा केल्याने त्यात बाजार परवानाचे मत वा कन्सेंट घेणे अनिवार्य असल्याचे म्हणते, बांधकाम विभाग तर कुणाचे मार्गदर्शन घेण्याच्या मानसिकतेतच नाही. त्यामुळे ११ डिसेंबरची मुदत १३ डिसेंबरला संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने मालू इन्फ्रास्पेसने उभारलेले लोखंडी पोल हटविणे क्रमप्राप्त होते. मात्र ते अद्यापही जैसे थे आहेत.सत्ताधीश, विरोधकांचे मौनअनधिकृत करारनाम्याच्या आधारे महापालिकेच्या रस्त्याचा दुभाजक १० वर्षांसाठी एका विकासकाला आंदण दिला जातो. त्याच गैर करारनाम्याच्या आधारे तो विकसक महापालिकेला आव्हान देतो. मात्र, त्याला जाब विचारण्याचे धारिष्ट्य ना प्रशासन दाखविते ना पदाधिकारी. महापौर स्थायी समिती सभापतींची या गैरप्रकाराला मूकसंमती तर नाही ना, अशी शंका येईपर्यंत मालू इन्फ्रास्पेसप्रकरणी पदाधिकाऱ्यांच्या स्तरावर स्मशानशांतता पसरली आहे.