शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नसे भय गृहराज्यमंत्र्यांचेही !

By admin | Updated: February 16, 2016 00:07 IST

शहर पोलिसांची जराही भीती न बाळगता चेनस्नॅचिंगचे राजरोस गुन्हे करणाऱ्या चेनस्नॅचर्सनी गृहराज्यमंत्र्याच्या नगरवास्तव्यादरम्यानही चेनस्नॅचिंग करण्याचे धारिष्ठ््य दाखविले.

आव्हान : पोलिसांच्याहीपुढे चेनस्नॅचर्सअमरावती : शहर पोलिसांची जराही भीती न बाळगता चेनस्नॅचिंगचे राजरोस गुन्हे करणाऱ्या चेनस्नॅचर्सनी गृहराज्यमंत्र्याच्या नगरवास्तव्यादरम्यानही चेनस्नॅचिंग करण्याचे धारिष्ठ््य दाखविले. राजापेठ भागातील हरिगंगा आॅईल मिल परिसरात सोमवारी सायंकाळी चेनस्नॅचिंगचा प्रयत्न झाला. सुदैवाने तो अयशस्वी ठरला. मंगळसूत्र नकली असल्याने महिलेनेही तक्रार नोंदविण्यास नकार दिला. या घटनेला राजापेठचे ठाणेदार एस.एस.भगत यांनी दुजोरा दिला. अंबानगरीच्या सुरक्षेसाठी दोन हजार पोलिस तैनात आहेत. सीआर मोबाईल, नाकाबंदी, रात्रकालीन गस्त, पायदळ गस्त, वाहतूक पोलिस अशी विविध पातळीवारील सुरक्षा शहरवासीयांसाठी उपलब्ध आहे. तथापि, हे चेनस्नॅचर्स ही तमाम सुरक्षा भेदून पोलिसांना हुलकावणी देण्यात नेहमीच यशस्वी ठरले आहेत. पोलिस आपाल्याला पकडूच शकत नाहीत, असा विश्वास त्यांच्या ठायी आता बळावला आहे. चेनस्नॅचर्स पोलिसांच्या तुलनेत एक पाऊल पुढे आहेत. चेनस्नॅचर्सच्या गुन्हेगारी पध्दतीच्या कुठल्याशा निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचत असतानाच चेनस्नॅचर्सने चोरीची पध्दती बदविलेली असते. पूर्वी निर्जन भागातून पायदळ जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करण्याचे तंत्र चेनस्नॅचर्सनी अवलंबिले. पुढे त्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांचा पाठलाग करून दागिणे हिसकावले. कधी कधी पुन्हा ते पायदळ महिलांना लक्ष्य करून दिशाभूल करतात. मंगळसूत्र चोरांवर पोलिसांचा जसा वचक नाही, तसाच तो राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांचाही नाही, हेच सोमवारच्या घटनेतून सिद्ध झाले. रणजित पाटील दिवसभर शहरात असताना, पोलीस मित्रांचा कौतुक सोहळा सुरू असताना चेनस्नॅचरर्सना मंगळसूत्र हिसकावण्यासाठी कुण्या महिलेवर हात घालायला जराही भय वाटू नये, ही बाब पोलीस प्रशासनासाठी निश्चितच चिंतनीय आहे. एक पाय कायम अमरावतीत ठेवणाऱ्या गृहराज्यंमत्र्यांनाही गंभीर दखल घ्यावी, अशीच ही घटना. (प्रतिनिधी)