शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा विलगीकरणात महापालिका ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 22:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कचऱ्यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकचऱ्याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. जून २०१८ अखेरपर्यंत ७५ टक्के कचऱ्याचे विलगीकरण करणे अनिवार्य राहील. राज्यात विविध ठिकाणी पेटलेल्या कचरा प्रश्नाच्या अनुषंगाने या निर्देशांना ...

ठळक मुद्देजून २०१८ ची नव्याने 'डेडलाईन' : स्वच्छ महाराष्ट्र अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कचऱ्यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकचऱ्याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. जून २०१८ अखेरपर्यंत ७५ टक्के कचऱ्याचे विलगीकरण करणे अनिवार्य राहील. राज्यात विविध ठिकाणी पेटलेल्या कचरा प्रश्नाच्या अनुषंगाने या निर्देशांना अत्याधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका, असे विलगीकरण करण्याची ‘कचरा लाख मोलाचा’ ही मोहीम १ मे २०१७ पासून राबविण्यात आली. मात्र, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ती मोहीम यशस्वीपणे राबविली नसल्याचे निरिक्षण सरकारने नोंदविले आहे. शासनस्तरावरून वारंवार पाठपुरावा करूनदेखील अद्यापही कचऱ्याचे समाधानकारकरीत्या विलगीकरण होताना दिसत नसल्याचे निरीक्षण नगरविकास विभागाने नोंदविले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुदीनुसार, राज्यातील प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस तातडीचे निर्देश देण्यात आले आहेत.वाहतूकही विलगीकृतच...: शहरात दररोज निर्माण होणाऱ्या १०० टक्के घनकचºयाचे घरोघरी (डोअर टू डोअर) जावून विलगीकृत स्वरूपात संकलन करण्याची कारवाई करण्यात यावी, याशिवाय त्या घनकचºयाची विलगीकृत स्वरूपात वाहतूक करणे अनिवार्य असेल. त्यामुळे वर्तमान परिस्थितीत अनेक महापालिकांमध्ये ओला व सुका कचरा एकत्रितपणे कम्पोस्टवर नेऊन टाकला जातो. ती पद्धत बंद करून त्यात सुधारणा करावी लागणार आहे.असे आहेत निर्देशशहरात दररोज निर्माण होणाऱ्या १०० टक्के घनकचऱ्याचे, निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा असे विलगीकरण करणे अपेक्षित आहे. त्यानुसार नगर परिषद व जुन्या नगरपंचायत क्षेत्रामध्ये मे २०१८ अखेरपर्यंत तसेच सर्व महापालिका यामध्ये जून २०१८ अखेरपर्यंत ७५ टक्के कचऱ्याचे विलगीकरण करणे अनिवार्य असेल.