शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावच्या मातीतील ‘कोहीनूर’ हरपला!

By admin | Updated: September 20, 2016 00:08 IST

काश्मिरच्या धगधगत्या अग्निकुंडात स्वत:ची आहुती देऊन देशाचे रक्षण करणारा नांदगावच्या मातीतील ‘कोहीनूर’ हरपला.

माता-पित्याचा हृदयद्रावक विलाप : दिवसभर थांबले नाहीत गावकऱ्यांचे अश्रू, एकाही घरात पेटली नाही चूलसंजय जेवडे/मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरकाश्मिरच्या धगधगत्या अग्निकुंडात स्वत:ची आहुती देऊन देशाचे रक्षण करणारा नांदगावच्या मातीतील ‘कोहीनूर’ हरपला. आमचा पंजाब गेला. पुत्रवियोगात आक्रोश करावा की देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या चिरंजीवाला गर्वाने ‘सॅल्यूट’ठोकावा, अशा संभ्रमात वीरमाता-पिता प्राण कंठाशी आणून त्याच्या पार्थिवाची प्रतीक्षा करताहेत. सांत्वनासाठी येणाऱ्यांच्या गळ्यात पडून वीरमाता क्षणात अश्रू ढाळते, तर क्षणात पुन्हा नि:शब्द होते. पित्याला तर काय करावे, तेच कळत नाही. शून्यात नजर लाऊन ते बसून आहेत. भावा-बहिणींचा आक्रोश पाहावत नाही. गावकरीही अबोल झालेत. आज सकाळी गावात पंजाब उईके शहीद झाल्याची बातमी धडकली आणि सारे गाव स्तब्ध झाले. हळूहळू पंजाब यांच्या घरापुढे गर्दी जमू लागली. तोवर झालेल्या घटनेपासून अनभिज्ञ असलेल्या कुटुंबीयांना काही तरी विपरीत घडल्याची कुणकुण लागली आणि मग पंजाबची आई बेबीतार्इंचा धीर सुटला. देशाच्या रक्षणासाठी ज्याला मोठ्या धाडसाने हसत-हसत रवाना केले, तो काळजाचा तुकडा देशाच्या रक्षणासाठी वीरगतीस प्राप्त झाला, हे कळताच त्या माऊलीला धक्का बसला. क्षणभर ती नि:शब्द झाली. मग, डोळ्यांतून वाहणाऱ्या अविरत अश्रुधारा थांबेचनात. विकास..विकास...असा मुलाच्या नावाचा जप करीत ती माऊली अजूनही रडतेय. घरात विकासची बाळंतीण बहीण. अवघ्या १० ते १२ दिवसांपूर्वीच तिची प्रसूती झालेली. गावकऱ्यांच्या मनात धगधगतोय अंगारनांदगाव खंडेश्वर : प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या आपल्या लाडक्या बहिणीशी गत ६ सप्टेंबरलाच पंजाबने दूरध्वनीवरून संवाद साधला होता. तिची आस्थेने विचारपूस केली होती. प्रसूतीसाठी १० हजार रूपयेदेखील पाठविले होते. त्यानंतर तिला कन्यारत्न प्राप्ती झाली. भाचीला बघण्याची विकासची धडपड सुरू होती. पण, भाचीचे तोंड बघण्यापूर्वीच तो वीरगतीस प्राप्त झाला. त्याची बहिण भावासोबत झालेला शेवटचा संवाद आठवून हमसून हमसून रडते आहे. भावाचा तर आधारच गेलाय. मनात पाकिस्तानविरूद्ध धगधगणारा अंगार ज्येष्ठांनी कसाबसा थोपवलाय पण तरूण मात्र खदखदतोय..नारेबाजी करतोय...पाकिस्तानचे झेंडे जाळतोय...असे चित्र आहे शहीद विकास ऊर्फ पंजाब उईके यांच्या नांदगावातील. पाकिस्तानने भ्याड हल्ला करून या जवानांचा बळी घेतला. त्या पाकिस्तानला शासनाने धडा शिकवाच, अशी मागणी युवक करीत होते. गावकऱ्यांनी रेखाटल्या रस्तोरस्ती रांगोळ्यासोमवारी शहीद पंजाब उईके याचे पार्थिव बघण्यासाठी नांदगाववासी सकाळपासूनच प्रतीक्षेत होते. रस्त्यांवर गर्दी जमली होती. महिलांनी रस्तोरस्ती झाडून सुरेख रांगोळ्या रेखाटल्या होत्या. वीरमरण प्राप्त करून देशासाठी आहुती देणाऱ्या आपल्या गावच्या सुपुत्राला ‘यादगार’निरोप देण्यासाठी अख्खा नांदगाव झटतोय. महसूल आणि पोलीस प्रशासनाची १५० जणांची चमू आज नांदगावात तैनात होती. सायंकाळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह, एसडीपीओए, एसपी, चौदा तालुक्यांचे ठाणेदार नांदगावात पोहोचले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता शहीद पंजाब उईकेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराला पालकमंत्री राहणार उपस्थितजिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे मंगळवारी सकाळी मुंबईवरून येऊन सकाळी १०.४५ वाजता नांदगाव येथे शहीद विकास उईके याला श्रद्धांजली अर्पण करणार आहे. त्यांच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वना करणार आहे.पित्याला झाले अनावर आभाळाएवढे दु:खजानराव उईके यांनी ३३ वर्षे सैन्यात राहून देशसेवा केलेली. त्यामुळे मृत्यूची सतत डोक्यावर असलेली टांगती तलवार त्यांना माहीत होती. तरीही त्यांनी निवृत्त झाल्यानंतर विकासला सैन्यात पाठविले. तरीही त्यांना तरण्याताठ्या पंजाबचा मृत्यू पचविणे सोपे गेले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव, डोळ्यांत राहून-राहून तरळणारे अश्रू पाहून ही बाब लक्षात येत होती. दिलदार मित्र गमावला !सुरूवातीला नांदगावातील जि.प.शाळा व त्यानंतर शिवाजी हायस्कूल येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पंजाब उईके यांनी घेतले. त्यांचे वर्गमित्र असलेले सचिन जोगदंडे व भूषण वैद्य सांगतात, अभ्यासात पंजाब सुरुवातीपासूनच हुषार. पहिल्या तीन मध्ये त्याचा क्रमांक ठरलेला. स्वभाव अतिशय विनम्र, कुणालाही पहिल्याच भेटीत जिंकून घेणारा. मित्रांच्या अडी-अडचणीला धावणारा. एकदा का एखाद्याशी त्याचा परिचय झाला की ती व्यक्ती पंजाबला विसरणे केवळ अशक्यच. सैन्यात नोकरी लागूनही गर्व त्याला शिवला नव्हता. सुट्यांमध्ये गावी आल्यानंतर तो मित्रांसोबत धम्माल करायचा. त्याच्या भाचीच्या जन्मानंतर त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेले फोटोग्राफ्स जम्मू काश्मिरमध्ये तो तैनात असलेल्या ठिकाणी नेटवर्क नसल्याने त्याला बघताही आले नाहीत, हे सांगताना सचिन जोगदंडे यांचा गळा भरून आला होता. मात्र, आपल्या या दिलदार मित्राने देशासाठी शौर्य गाजवून नांदगावचे नाव अजरामर केल्याचा अभिमानही या मित्रद्वयांच्या बोलण्यातून झळकत होता.