शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राखीतून गुंजणार 'नमो नमो'ची धून

By admin | Updated: August 22, 2015 00:41 IST

भाऊ-बहिणीच्या नात्याची जोपासना करणारा रेशमी बंध अर्थात रक्षाबंधनासाठी विविध आकर्षक रेशमी बंध, संगीतमय राख्यांनी बाजारपेठ सजली आहे.

बाजारपेठ सजली : विविध आकर्षक रेशीमबंध, संगीतमय राख्याअमरावती : भाऊ-बहिणीच्या नात्याची जोपासना करणारा रेशमी बंध अर्थात रक्षाबंधनासाठी विविध आकर्षक रेशमी बंध, संगीतमय राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. यंदा या उत्सवाचे खास आकर्षण मोदीची नमो नमो म्हणणारी म्युझिकल राखी ठरत आहे. नमो-नमो या संगीताचा जयजयकार आता बालगोपालांच्या हातावरही गुंजणार आहे. दरम्यान आर्थिकसंकटामुळे बाजारपेठेवर असलेले मंदीचे सावट लक्षात घेऊन राख्यांच्या दरात वाढ झालेली आहे.शनिवार २९ आॅगस्टला रक्षा बंधन आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांची दुकाने सजली आहेत. पारंपरिक देव राखीची जोडी पाच रुपयाला मिळते. रेशीम धाग्याला असलेली गोंडे २० ते ३० रुपये डझन आहेत. वर्कच्या राखीचे अनेक प्रकार असून त्या १० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहेत. त्या खालोखाल मागणी असते. वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही राखी २० रुपयांपासून ४५० रुपये डझन आहे. डायमंड राखी ५ रुपये नगापासून २५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. रक्षाबंधन सणाला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने ग्राहकांची दुकानांमध्ये फारशी गर्दी नाही. मात्र गर्दी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)