शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जप्त मालमत्ता महापालिकेच्या नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:59 IST

वारंवार नोटीस देऊनही थकीत कर न भरणाऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा धाडसी निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्या मालमत्ता घेण्यास कुणी समोर न आल्यास त्या आयुक्तांच्या नावे करण्याची प्रक्रिया आरंभण्यात आली आहे.

ठळक मुद्देआज लिलाव : २० कोटींचे ‘टार्गेट पूर्ण करण्याची धडपड

आॅनलाईन लोकमतअमरावती : वारंवार नोटीस देऊनही थकीत कर न भरणाऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा धाडसी निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्या मालमत्ता घेण्यास कुणी समोर न आल्यास त्या आयुक्तांच्या नावे करण्याची प्रक्रिया आरंभण्यात आली आहे. सोमवार, २६ फेब्रवारीला २५ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. राजापेठ झोन कार्यालयात ही लिलाव प्रक्रिया दुपारी ४ वाजेपासून सुरू होईल.महापालिकेचे मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. परंतु, यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. याशिवाय मोबाईल टॉवर व बँकांनीही महापालिकेला ठेंगा दाखविला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाची कराची एकूण मागणी ४७.२२ कोटी रुपये असताना महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत केवळ २५ ते २६ कोटी रुपये आल्याने अवघ्या महिनाभरात २० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्याचे आाव्हान महापालिका प्रशासनासमक्ष उभे ठाकले आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रातील ६९९ मालमत्तांवर जप्तीची टाच आणण्यात येणार आहे.झोन क्रमांक १ मधून ११९७ मालमत्ता जप्तीच्या नोटीस दिल्या होत्या. त्यापैकी प्रथम टप्प्यात ४४४ मालमत्तांचा लिलाव होणार आहे. झोन क्रमांक २ मधून ५३९ पैकी १०४ मालमत्तांचा लिलाव होईल. झोन ४ मधून ४६३ पैकी प्रथम टप्प्यात ८७ मालमत्ता लिलावात काढल्या जातील. झोन ५ मधून २२६ पैकी २६ मालमत्तांचे लिलाव करण्यात येणार आहे. रामपुरी कॅम्प झोनमधील ६६ मालमत्तांचा ५ मार्चला जाहीर लिलाव केला जाणार आहे. ५५ लाख ९३ हजार ८२३ रुपये थकबाकीसाठी हा लिलाव होणार असून, सर्वात मोठे थकबाकीदार म्हणून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. या संस्थेने महापालिकेचे ३५.२५ लाख रुपये थकविले आहेत.राजापेठ झोनने २३ फेब्रुवारीला ६४ मालमत्तांचा लिलाव प्रक्रिया आरंभली. त्यात प्रामुख्याने युनियन बँक ही मालमत्ता होती. मात्र, या बँकेसह अन्य ३८ मालमत्ता धारकांनी लिलावापूर्वी थकीत रक्कम भरल्याने त्यांची नावे लिलावातून वगळण्यात आली. उर्वरित २५ मालमत्तांचा लिलावात कुणीही सहभागी न झाल्याने त्या मालमत्तांसाठी पुन्हा २६ फेब्रुवारीला लिलाव होईल.महापालिका क्षेत्रातील पाचही झोनअंतर्गत येणाºया थकीत मालमत्ताधारकांची यादी बनविण्यात आली आहे. मालमत्ताधारकांनी कराचा भरणा त्वरित करावा, अन्यथा त्या मालमत्ता जप्त करुन त्यांचा लिलाव करण्यात येत आहे.- हेमंत पवार, आयुक्त