अचलपूर : कचरा व्यवस्थापनाअंर्तगत कचर्याचे विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अचलपूर पालिका क्षेत्रात त्याला फाटा दिला जात आहे. ओला व सुका कचरा एकत्रच संकलित केला जात असून, त्याची विल्हेवाट देखील तशीच लावली जात आहे.
पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर बाजूला कचरा टाकण्याकरिता स्टॅन्ड ठेवण्यात आले आहे . यावर दोन स्वतंत्र बास्केट बसविल्या गेल्यात. यातील एक सुका कचरा तर दुसरी ओला कचरा टाकण्याकरिता ठेवल्या गेली होती. दरम्यान मागील काही महिन्यांपासून यातील सुका कचऱ्याची बास्केट गायब आहे. गायब असलेली ती बास्केट लक्षवेधक ठरत आहे. नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयातून सुका कचरा निघणे बंद झाल्याचे ती रिकामी जागा दर्शवित आहे. संपुर्ण शहरातही तिच परिस्थती आहे.