शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना
2
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
3
"...तर आमचा देश उद्ध्वस्त होईल"; कोर्टाने टॅरिफचा निर्णय चुकीचा ठरवल्यावर संतापले डोनाल्ड ट्रम्प
4
Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी
5
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
6
"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव
7
Asia Cup 2025साठी ओमानचा संघ जाहीर, पण कर्णधार मात्र भारतीय; जाणून घ्या 'तो' कोण?
8
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण २०२५: कधी लागेल ग्रहण, भारतात कुठे दिसणार? पाहा, मान्यता
9
"अनेकांना माहितही नव्हतं की ती आजारी आहे कारण...", प्रियाच्या आठवणीत अभिनेत्री भावुक
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, अडकलेले पैसे मिळतील; ६ राशींना संमिश्र, सावध असावे!
11
महाराष्ट्रात शिक्षणावर प्रति विद्यार्थी किती खर्च? कोणत्या शाळा परवडणाऱ्या? वाचा
12
भागवत सप्ताह प्रारंभ २०२५: ५००० वर्षांची परंपरा, १८००० श्लोक; मोक्षदाता परमोच्च पवित्र ग्रंथ!
13
विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?
14
Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!
15
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
16
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
17
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
18
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
19
आजचा अग्रलेख: ड्रॅगन-हत्तीच्या मैत्रीची मजबुरी
20
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!

नामांतराची पसरली लाट

By admin | Updated: April 8, 2015 00:16 IST

नावात काय आहे, असा सवाल जगप्रसिध्द लेखक, नाटककार शेक्सपिअर यांनी केला होता़ असे असले तरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत स्वत:चे नाव...

संख्याशास्त्रामुळे क्रे झ : दोन हजार नागरिकांच्या नावात बदल मोहन राऊत  अमरावतीनावात काय आहे, असा सवाल जगप्रसिध्द लेखक, नाटककार शेक्सपिअर यांनी केला होता़ असे असले तरी जिल्ह्यात मागील चार वर्षांत स्वत:चे नाव, आडनाव बदलविण्याची जणू लाटच आली आहे़ तब्बल दोन हजार नागरिकांनी त्यांची नावे बदलविली आहेत़ संख्याशास्त्रामुळे नाव बदलविण्याची के्रझ निर्माण झाली आहे़विवाह झाल्यानंतर माहेरकडील वडिलांचे नाव व आडनाव बदलवून पतीचे नाव तसेच आडनाव लावण्याची पद्धती आजही कायम आहे़ एखाद्या गृहस्थाला मूल दत्तक घेतल्यानंतर आपले नाव, आडनाव लावण्यासाठी थेट अर्ज करावे लागतात. मात्र आता दिवसेंदिवस शकून, अपशकून याबरोबरच संख्याशास्त्रामुळे नाव बदलण्याची के्रझ वाढली आहे़ मागील चार वर्षांत नागपूर येथील शासकीय मुद्राणालयात आपले नाव बदलविण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत़ त्याप्रमाणे आता नाव बदलून गव्हर्मंेन्ट गॅजेटमध्ये नवी नावे आली आहेत़ ज्यांना त्यांच्या कार्यात म्हणावे तितके यश संपादन करता आले नाही़ वयाची चाळीसी गाठली; परंतु लग्न जुळले नाही, नोकरी व कामधंदा नाही, लग्न झाले परंतु मुले झाली नाहीत, अशा विविध कारणांमुळे तरूण युवक, युवती यांनी संख्याशास्त्रावरून भविष्य सांगणाऱ्यांचे उंबरठे झिजवून नाव बदलविले आहे़ नाव बदलविल्यामुळे त्यांची स्वाक्षरीही बदलल्याचे दिसून येते़ नाव, स्वाक्षरी बदलविल्यामुळे जीवनात विलक्षण बदल झाला असल्याचे एका नाव बदलविलेल्या युवकाने सांगितले़ नाव बदलविणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. ईश्वराच्या नावाला महत्त्वमागील अनेक पिढ्यांपासून घरात जन्मलेल्या मुलांचे नाव राम, वासुदेव, लक्ष्मण, जयराम, श्रीकृष्ण असे ईश्वराचे तर मुलींचे नाव मीरा, सीता, मुक्ता, असे नाव ठेवण्याची पद्धत होती़ यामागील मुख्य कारण म्हणजे दररोज आपल्या मुलांच्या नावामुळे ईश्वराचे नाव आपल्या मुखातून निघेल अशी श्रद्धा होती़ आता सिनेमातील कलाकारांचे नाव ठेवण्याची के्रझ आली असल्याचे विरूळ रोंघे येथील जोशी यांनी सांगितले़