शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निंभोऱ्यात इसमाची गळा दाबून हत्या

By admin | Updated: November 29, 2015 00:55 IST

रात्री घरी विश्रांती घेत असलेल्या एका ४८ वर्षीय इसमाची अज्ञात इसमाने गळा दाबून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी निंभोरा बोडखा येथे उघडकीस आली़ ....

परिसरात आढळली दोरी : गुन्हे शाखेचे पथक दाखलधामणगाव (रेल्वे) : रात्री घरी विश्रांती घेत असलेल्या एका ४८ वर्षीय इसमाची अज्ञात इसमाने गळा दाबून हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी निंभोरा बोडखा येथे उघडकीस आली़ घटनास्थळी दोरीचा तुकडा आढळून आला. दरम्यान, गुन्हे शाखेचे पथक सायंकाळी घटनास्थळी दाखल झाले.गजानन रामकृष्ण बढीये असे मृताचे नाव आहे. गावात ते एकटेच राहत होते. शनिवारी सकाळी गजाननचे नातेवाईक चहा देण्यासाठी गेले असता त्याचा खाटेवर मृतदेह आढळला़ मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या माहितीनुसार, गजाननचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर पत्नीने सोडचिठ्ठी दिल्यावर तो घरी एकटाच राहत होता़ गजाननला तीन भाऊ असून ते गावातच शेजारी राहतात. गजाननचे वडील रामकृष्ण बढीये यांनी तीन एकर शेती मृत्यूपूर्वी गजाननच्या नावे करून दिली होती़ ही शेती नातेवाईकाला मक्त्याने देत असत़ मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गजानननच्या हत्येसंदर्भात अज्ञात इसमाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ मृतदेह पुलगाव येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दुपारी ४ वाजता पाठविण्यात आला आहे़ प्रभारी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तथा चांदूररेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजाराम सामी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे़ गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ घटनेचा अधिक तपास मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार अमित वानखडे करीत आहे़ (प्रतिनिधी)