शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वरुडच्या नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी निलंबित; वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 20:39 IST

वरुड तालुका वकील संघांद्वारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्र्याची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी नायब तहसीलदारांच्या कारनामांचा पाढाच महसूल मंत्र्यांसमोर वाचला.

 गजानन मोहोडअमरावती : वरुड तहसील कार्यालयात प्रकरणानिमित्त आलेल्या वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांना चांगलेच भोवले आहे. विभागीय आयुक्त डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी त्यांना निलंबित केल्याची माहिती ना. विखे पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

वरुड तालुका वकील संघांद्वारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्र्याची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी नायब तहसीलदारांच्या कारनामांचा पाढाच महसूल मंत्र्यांसमोर वाचला. याबाबत यापूर्वी तहसीलदार ते विभागीय आयुक्त ते राज्याचे मुख्यमंत्र्यांपर्यत तक्रारी करण्यात आल्याचेही संघाद्वारा सांगण्यात आले. यावर महसूल मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना ‘त्या’ नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याची सुचना केली. त्यानुसार नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

नायब तहसीलदार चौधरी यांच्या विरोधात वकील संघाचे २९ सप्टेंबरचे सभेत सर्वानुमते ठरावदेखील पारीत करण्यात आला होता. त्यानूसार चौधरी यांची बदली करण्यात यावी व त्यांची बदली होईतोवर त्यांच्याकडील प्रकरणे अन्य सक्षम नायब तहसीलदार यांच्याकडे पाठविण्याचे निवेदन देण्याचे ठरले होते. असे वकील संघाद्वारा महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. नायब तहसीलदार चौधरी यांच्या निलंबनाचे मौखिक आदेश विभागीय आयुक्तांनी दिले असल्याचे प्रशासनाने सांगितले.