लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन नव्या संचालकपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. संचालकपदासाठी एकूण १५ अर्ज प्राप्त झाले असून, या पदावर नागपूरकरांचा डोळा असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे अर्जाची छाननी, मुलाखती आदी बाबी केवळ औपचारिक असल्याचे बोलले जात आहे.विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन विद्यमान संचालक जयंत वडते यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासनाने या पदासाठी पात्र उमेदवारांकडून जानेवारी महिन्यात अर्ज मागविले. यासाठी एकूण १५ जणांचे अर्ज प्राप्त झाले. मध्यंतरी सिनेट निवडणूक, नंतर अधिसभा आदी कारणास्तव परीक्षा व मूल्यमापन संचालकपदाच्या निवडीची प्रक्रिया थंडावली. मात्र, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी संचालकपदी जूनअखेर पात्र व्यक्तिच्या निवडीसाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. संचालकपदासाठी अर्जाची छाननी करण्यासाठी समिती गठित केली होती. त्यानुसार समितीने कार्यअहवाल विद्यापीठ प्रशासनाला सादर केला. त्यामुळे जूनअखेर परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नवा चेहरा निवडला जाईल, अशी तयारी प्रशासनाने चालविली आहे. यात कुलगुरू पदावर आसनस्थ असलेल्या नागपूर येथील नामांकित व्यक्तीने संचालकपदासाठी अर्ज सादर केला आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या व्यक्तिकडे असल्याची माहिती आहे. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू चांदेकर यांच्यानंतर नवे परीक्षा व मूल्यमापन संचालक पदावर नागपूरकरांची निवड होईल, अशी दाट शक्यता आहे.छाननी समितीने अहवाल सादर केलेला आहे. आता केवळ परीक्षा व मूल्यमापन संचालक पदासाठी मुलाखत घेणे बाकी आहे. १५ जणांचे अर्ज ग्राह्य ठरले असून, पात्र व्यक्तिची या पदासाठी निवड केली जाईल.- अजय देशमुखकुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.
विद्यापीठात परीक्षा संचालक पदावर नागपूरकरांचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:53 IST
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन नव्या संचालकपदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. संचालकपदासाठी एकूण १५ अर्ज प्राप्त झाले असून, या पदावर नागपूरकरांचा डोळा असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे अर्जाची छाननी, मुलाखती आदी बाबी केवळ औपचारिक असल्याचे बोलले जात आहे.
विद्यापीठात परीक्षा संचालक पदावर नागपूरकरांचा डोळा
ठळक मुद्देहालचालींना वेग : नव्या संचालकपदासाठी अर्जांची छाननी पूर्ण