ऑनलाइन लोकमत -
वर्धा, दि, १३ - नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने सुरु असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुळजापूर ते सिंदी रेल्वेमार्गावर पेंटाग्राफ तुटल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळी अमरावती - अजनी इंटरसिटी एक्सप्रेसचा पेंटाग्राफ तुटला होता. काही वेळानंतर पेंटाग्राफ दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात आले मात्र त्यामुळे रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने सुरु असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.