शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सट्ट्याचे नागपूर कनेक्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

राजस्थान रॉयल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या लाइव्ह मॅचवर क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करून तिघेही बुकी अनिल ऊर्फ कॉस्को मेटकर (रा. देशपांडे प्लॉट, अमरावती) या बुकीकडे लगवाडी करताना मिळून आले. यातील कॉस्को हा नागपूर व गोव्यातील एका बड्या बुकीकडे आकड्यांचा उतारा करीत असल्याची माहिती समोर आली. तो बडा मासा सिराज असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावर सट्ट्याद्वारे कोट्यवधींच्या बोली लावली जात आहेत. शहरात यासाठी सुमारे २०० पेक्षा अधिक बुकींचे जाळे कार्यरत असल्याची माहिती असून, आयपीएल सट्ट्याची तार नागपूरशी जुळली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. २८ व २९ मार्च रोजी शहर गुन्हे शाखा व पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने धाड घालून दोन ठिकाणचा आयपीएलवर चालणारा जुगार उद्ध्वस्त केला. अटक बुकींच्या चौकशीअंती ‘सिराज’ नामक बड्या माशाचे नाव समोर आले असून, तो नागपूरचा असल्याची पोलिसांची माहिती आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने  २८ मार्च रोजी रात्री नागपूर मार्गातील रहाटगाव येथे असलेल्या एका रेस्टॉरंट अँड बारमध्ये  कारवाई करीत  गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यावर बेटिंग करीत असलेल्या  अमर शिरभाते (कल्याणनगर) व राहुल नगरे ( मच्छीसाथ)  यांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ६४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील शेगाव-रहाटगाव रोडवर असलेल्या वैष्णवी विहारमधून २९ मार्च रोजी रात्री सुरेंद्र साहू (३८), नीलेश साहू (४३) व लकी साहू (तिघेही रा. मसानगंज) यांना अटक करण्यात आली. राजस्थान रॉयल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या लाइव्ह मॅचवर क्रिकेट सट्ट्याची खयवाडी करून तिघेही बुकी अनिल ऊर्फ कॉस्को मेटकर (रा. देशपांडे प्लॉट, अमरावती) या बुकीकडे लगवाडी करताना मिळून आले. यातील कॉस्को हा नागपूर व गोव्यातील एका बड्या बुकीकडे आकड्यांचा उतारा करीत असल्याची माहिती समोर आली. तो बडा मासा सिराज असल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. या प्रकरणात आणखी काय बाहेर पडते, याकडे गुन्हेगारी विश्वाचेही लक्ष आहे.

अशी आहे साखळी सट्टा बाजारात बुकी, एजंट, सबएजंट व सट्टा लावणारे अशी साखळी असते. एजंट किंवा सबएजंट बुकिंग घेऊन बुकीला सारखे कळवत असतात. ज्या साखळीद्वारे पैसे मुख्य बुकीपर्यंत पोहोचतात, त्याच साखळीने पैसे ग्राहकापर्यंत येत असतात. एजंट, सबएजंट यांना बुकिंगच्या ५ ते १० टक्के कमिशन दिले जाते. आयपीएल फीवर सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक सामन्यावर लावल्या जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ होत आहे.

असा खेळला जातो सट्टाआयपीएलमधील सट्टा विजय किंवा पराजयावरच खेळला जात नाही, तर टॉसपासून प्रत्येक चेंडूवरही लावला जातो. कोणता खेळाडू किती धावा काढणार, कोणता गोलंदाज किती विकेट काढणार, कोणत्या ओव्हरमध्ये षटकार किंवा विकेट पडणार, यावरही सट्टा लागतो. याशिवाय सेशन म्हणजे १० ओव्हरमध्ये कोणत्या संघाच्या किती धावा होतील, यावरही सट्टा लावला जातो. एका सेशनमध्ये ७० धावा, असे बुकीने सांगितल्यास त्यावर ‘अप’ किंवा ‘डाऊन’ असे सांगून बोली लावली जाते. सट्ट्याचे सर्व व्यवहार फोनवरून सतत सुरू असतात. सामना जसजसा पुढे जातो, तसतसा रेटमध्येही बदल होतो.

 

टॅग्स :Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी