शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावती पॅसेंजर गाडीला धोकादायक थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:21 IST

एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या मेमू पॅसेंजर या रेल्वे गाडीला बडनेऱ्यात थांबा नसल्याने ही गाडी आऊटरला थांबते. नाइलाजास्तव प्रवासी तेथूनच गाडीखाली उतरून बडनेरा स्थानक गाठतात. हा थांबा प्रवाशांसाठी, विशेषत: वृद्धांसाठी धोकादायक झाला आहे.

ठळक मुद्देजीव टांगणीला बडनेऱ्यात आऊटरला उतरतात २०० प्रवासी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: एक महिन्यापूर्वी सुरू झालेल्या मेमू पॅसेंजर या रेल्वे गाडीला बडनेऱ्यात थांबा नसल्याने ही गाडी आऊटरला थांबते. नाइलाजास्तव प्रवासी तेथूनच गाडीखाली उतरून बडनेरा स्थानक गाठतात. हा थांबा प्रवाशांसाठी, विशेषत: वृद्धांसाठी धोकादायक झाला आहे. हा थांबा बंद करून रेल्वे गाडी बडनेरा स्थानकात न्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.मुंबईत धावणाऱ्या लोकलचा चेहरामोहरा असणाऱ्या अमरावती ते नागपूर प्रवास करणाऱ्या मेमू गाडीला एक महिन्यापूर्वी हिरवा कंदील दाखविण्यात आला. मात्र, ही गाडी कॉड लाइनने जात असल्याने बडनेरा रेल्वे स्थानकावर येत नाही. बडनेऱ्यातून मोठा प्रवासी वर्ग या गाडीला आहे. जवळपास दोनशे प्रवासी मेमू गाडीतून बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आउटरला उतरतात. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचा अधिकृत थांबा नाही. उतरणारे सर्व प्रवासी रेल्वे रुळाच्या बाजूने बडनेरा स्थानकावर पोहचतात. हा प्रकार प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजीचा सूर आहे. ही गाडी थेट बडनेरा रेल्वे स्थानकावर आणावी आणि प्रवासी उतरल्यानंतर अमरावतीसाठी रवाना करण्यात यावे. खासदार नवनीत राणा यांनी या समस्येकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.मेमू आता आठ डब्यांचीअमरावती ते नागपूर मेमू पॅसेंजर जेव्हा सुरू झाली तेव्हा तिला १६ डबे होते. या रेल्वे गाडीला मोठा प्रवासी वर्ग आहे. या मार्गात प्रत्येक स्थानकावर ती थांबते. माफक तिकीट दर असल्याने प्रवाशांची तिला पसंती आहे. मात्र, एकाएकी या गाडीचे आठ डबे कमी करण्यात आले. प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या गाडीला सोळा डबे ठेवण्यात यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे