शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत निवडणूक पराभूत उमेदवारांची मतदारांकडून वसुली

By admin | Updated: November 5, 2015 00:16 IST

नगरपंचायत निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागताना शेवटच्या दोन दिवसांत काही उमेदवारांनी मतदारांना भेटवस्तू दिल्यात.

मत दिले नाही, भेट वस्तू परत करा !अमरावती : नगरपंचायत निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागताना शेवटच्या दोन दिवसांत काही उमेदवारांनी मतदारांना भेटवस्तू दिल्यात. मात्र , मतदान दुसऱ्याच उमेदवाराला केले. मतदारांनी दिलेल्या या चकम्यामुळे पराभूत उमेदवार या भेटवस्तू परत मागत आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी या भेटवस्तू मतदारांना दिल्यात तेच कार्यकर्ते तुम्ही ‘त्या’ उमेदवाराला मत दिले नाही ना? आता भेटवस्तू परत करा, असे सुनावताना दिसत आहेत. यामध्ये त्या मतदारांची मात्र अडचण झाली आहे. जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चार नगरपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झालेत. मतदारांनी उमेदवारांच्या आमिषाला बळी न पडता मतदान केले. मात्र, काही मतदार उमेदवारांनी दिलेल्या आमिषाला बळी पडले. त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या. प्रत्यक्षात निकालानंतर उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या पाहता भेटवस्तू व मतांच्या संख्येचा ताळमेळच जुळत नाही. चर्चेवर झाले शिक्कामोर्तबअमरावती : अवाढव्य खर्च करुनही पदरी आलेला पराभव जिव्हारी लागल्याने या उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच त्याच सायंकाळपासून भेटवस्तू परत मागण्याचा सपाटा लावला आहे. तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायत स्थापित झाल्यानंतर काही उमेदवार बाशिंग बांधून तयार झाले होते. निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच त्यांनी घरोघरी भेटी देण्याचा सपाटा लावला होता. प्रचाराच्या अखेरच्या दिवसांत काही मतदारांना भेटवस्तू दिल्याची चर्चा होती. मात्र, आता भेटवस्तू परत मागण्याचा प्रकार समोर आल्याने मतदारांना आमिष व भेटवस्तू दिल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.