शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पदवी प्रमाणपत्रे मिळणार ‘नॅड’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:36 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे ‘नॅशनल अ‍ॅकेडमिक डिपॉझिटरी’ या केंद्रीय अनुदान आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देअमरावती विद्यापीठाचा उपक्रम : आॅनलाईन पाहता येणार पदवी प्रमाणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाने विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे ‘नॅशनल अ‍ॅकेडमिक डिपॉझिटरी’ या केंद्रीय अनुदान आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठात ३४ व्या दीक्षांत समारंभात प्रदान केलेली सुमारे २२ हजारांपेक्षा जास्त पदवी प्रमाणपत्रे अपलोड केली आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणत्रासाठी विद्यापीठात येण्याची गरज भासणार नाही, हे विशेष.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाने सीडीएसएल व्हेन्चर लिमिटेड या कंपनासोबत करार केला आहे. नॅशनल अ‍ॅकेडमिक डिपॉझिटरी या यूजीसीच्या संकेत स्थळावर सर्व परीक्षांची सर्व विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे आॅनलाइन उपलब्ध झाल्यामुळे जगातील कोणत्याही ठिकाणावरून ती सहजतेने पाहता येतील आणि डाऊनलोड करून पदवी प्रमाणपत्राची प्रिंटदेखील काढू शकतील, अशी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय जे विद्यार्थी खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या पदवी प्रमाणपत्र पडताळण्याची गरज भासते. या प्रक्रियेला आॅफलाइनद्वारे बराच वेळ लागतो. मात्र, आता आॅनलाइनने पदवी प्रमापत्राची पडताळणी कमी वेळेत होणे शक्य झाले आहे. नव्या प्रणालीत प्रथमत: विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पाहण्यासाठी ‘नॅड’च्या संकेत स्तळावर नोंदणी करावी लागेल. याबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील आॅनलाइन सर्व्हिसेस या विंडोवर उपलब्ध आहे. विद्यापीठ क्षेत्रातील संबंधित विद्यार्थ्यांनी ३४ व्या दीक्षांत समारंभामध्ये प्रदान करण्यात आलेली पदवी प्रमाणपत्रे आॅनलाइन उपलब्ध असल्यामुळे ती त्यांना नॅशनल अ‍ॅकेडमिक डिपॉझिटरीवरून केव्हाही काढता येणार आहे. विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी केले.

पहिल्या टप्प्यात पदवी प्रमाणपत्रे आॅनलाईन देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींशी निगडीत सर्व आवश्यक कागदपत्रे ‘नॅड’वर उपलब्ध करून दिले जातील.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू

टॅग्स :universityविद्यापीठAmravatiअमरावती