शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘नॅक’ साहित्य खरेदी चौकशी अहवाल गुंडाळला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:06 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तीन वर्षांपूर्वी झालेल्या ‘नॅक’ समिती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात आलेल्या साहित्य, वस्तूंमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून केवळ चर्चाच : सामान्य निधीतून ८.५० कोटी खर्चाचे गौडबंगाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तीन वर्षांपूर्वी झालेल्या ‘नॅक’ समिती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात आलेल्या साहित्य, वस्तूंमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याअनुषंगाने कुलगुरूंच्या आदेशान्वये चौकशी समितीचे गठण झाले. मात्र, दोन वर्षांपासून चौकशी समितीकडून अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी होणाºया सिनेटमध्ये या मुद्द्यावर घमासान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मार्च २०१८ रोजी झालेल्या सिनेट सभेत प्रवीण रघुवंशी यांनी विद्यापीठात ‘नॅक’ समिती दौºयात बेमालूमपणे खर्च झाल्याप्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती. ३१ मार्च २०१५ रोजी विद्यापीठ कोषामध्ये सामान्य निधीत १७ कोटी शिल्लक होते, तर ३१ मार्च २०१७ रोजी सामान्य निधीत ८४ लाख १७ हजार ३६१ रुपये शिल्लक राहिले. ३१ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत शिल्लक निधी १७ कोटींवरून ८४ लाखांवर कसा आला? विद्यापीठात साधारण निधीत जमा होणारी रक्कम ही विद्यार्थ्यांच्या शुल्कातून येत असते. विद्यापीठाने सामान्य निधीतून दीड कोटी रुपये कसे खर्च केले, याबाबत चर्चा झाली.दरम्यान, लेखा विभागाने अधिसभेत सादर केलेल्या कागदपत्रांनुसार ‘नॅक’करिता आठ कोटी रुपये विद्यापीठाने साधारण निधीतून खर्च केल्याची बाब निदर्शनास आली. प्रवीण रघुवंशी यांनी सामान्य निधीतून ८.५० कोटी रुपयांच्या खर्चावर आक्षेप नोंदविला. दरम्यान, ‘नॅक’ खर्चाच्या अनियमितेबाबत प्राधिकरणांकडे तक्रार झाली काय, सन २०१६ मध्ये गठित समितीचा प्रवास कसा झाला, अशा विविध प्रश्नांवर प्रवीण रघुवंशी, दीपक धोटे, संतोष ठाकरे, विवेक देशमुख यांनी मते नोंदविली. चौकशी समिती गठित झाली असताना अहवाल गेला कुठे, याबाबत खुलाशाची मागणी झाली.कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ३० मार्च २०१६ रोजी ‘नॅक’ समिती दौºयात साहित्य, वस्तू खरेदीबाबत एफ.सी. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीचा अहवाल तीन महिन्यांच्या आत सादर करण्यात येईल, असा निर्णय घेतला. मात्र, चौकशी समितीला सात महिने लोटले असतानासुद्धा अहवाल प्राप्त झालेला नाही, हे विशेष.सर्व सिनेट सदस्यांना ‘नॅक’ खरेदी समितीचा चौकशी अहवाल देणे अपेक्षित होते. अद्याप तो मिळाला नाही. २४ नोव्हेंबर रोजी होणाºया सिनेट सभेत यासंदर्भात पुन्हा लक्षवेधी मांडली जाईल.- प्रवीण रघुवंशीसिनेट सदस्य, विद्यापीठ.