शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या भेटीने 'त्यांना' का उठावे पोटशूळ ?

By admin | Updated: June 18, 2015 00:25 IST

जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची मी भेट घेतली.

रावसाहेब शेखावत : मिसाईल कारखान्यासाठी राजनाथसिंहांशी भेटअमरावती : जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांसंदर्भात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची मी भेट घेतली. या भेटीचा अन्वयार्थ राजकीय बदलांशी लावला जात आहे. तथापि, काँग्रेसशी आमच्या घराण्याची कायम निष्ठा आहे. मी कुणाची भफट घेतली असेल तर काहींनी पोटशूळ का उठावे, असा सवाल आमदार रावसाहेब शेखावत यांनी उपस्थित केला. राजनाथसिंह यांच्याशी घेतलेल्या भेटीचा राजकीय अन्वयार्थ लावला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ते 'लोकमत'शी बोलत होते. देश व राज्यात भाजपचे शासन आहे. विकास कामांसाठी काँग्रेस नेत्यांनी भाजपकडे जाऊ नये, असा नियम नाही. मी आमदार नसलो तरी माझ्या कारकिर्दीत मुहूर्तमेढ रोवलेली कामे व्हावीत यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. त्यासाठी मंत्र्यांची भेट घेणे, रखडलेल्या कामांना गती देण्यासाठीचा आग्रह धरणे हा माझ्या कार्यशैलीचा भाग आहे. सत्तेत नसतानाही मी विकासकामांसाठी आग्रही असतो त्यामुळेच काहींची आता धडधड वाढली आहे. माझ्या पक्षांतराच्या वावड्या हा त्याच भितीपोटीचा परिणाम होय, अशा शब्दांत रावसाहेबांनी त्यांच्या पक्षांतराच्या बातम्या पसरविणाऱ्यांवर निशाना साधला. देशात काँग्रेसचे शासन असताना भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या नेत्यांकडे येवून विकास कामांसाठी आग्रह धरायचे. त्यामुळे भाजपचे नेते काँग्रेसवासी होताहेत, अशी चर्चा केली जात नव्हती. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुढाकारामुळेच अमरावतीत विमानरोधक मिसाईल निर्मिती कारखान्याची पायाभरणी करण्यात आली. माझ्या मातोश्रींमुळे अमरावतीच्या वाट्याला आलेल्या या महत्त्वाकांक्षी उद्योगाला मूर्त रूप मिळावे यासाठी मी भाजप सरकारच्या प्रभावी मंत्र्याची भेट घेतली. बडनेऱ्याचा रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना आणि पंचतारांकित एमआयडीसीत नव्या उद्योगांना चालना या मुद्यांवरही चर्चा झाली. सत्ता बदलत असली तरी विकासकामांसाठी कार्यरत राहणे हे नेत्यांचे कर्तव्यच आहे. मी तेच पार पाडले. त्यासाठी इतका कांगावा कशाला, असा प्रतिप्रश्न त्यांनी विरोधकांना केला. (प्रतिनिधी)आमच्या मनातही नाही, त्यांना स्वप्ने का पडावीत?शेखावत कटुंबीयांनी कॉग्रेसची साथ कधीही सोडली नाही. काँग्रेसशी आम्ही जी निष्ठा बाळगली त्याची वेगळी पावती देण्याची गरज आहे काय? काँग्रेसमुळेच प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्यात. त्यांच्या रुपाने अमरावतीलाही हा मान प्राप्त होऊ शकला. सत्तेसाठी पक्षांतर हा विचारही आम्हाला शिवत नसताना 'काही मोजक्या' मंडळींनाच त्याबाबत स्वप्ने का पडतात, हा संशोधनाचा खरा विषय असल्याची मल्लीनाथी रावसाहेबांनी केली.