शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

म्युकरमायकोसिसने घेतला जिल्ह्यातील पाच जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. स्टेरॉइडचा अतिरिक्त वापर, जास्त काळ आयसीयूमध्ये वास्तव्यास असलेले रुग्ण, मधुमेह रुग्ण, ऑक्सिजनचा वापर करताना न घेतलेली योग्य काळजी, स्वत:च्या मनाने स्टेरॉइडचे प्रमाण अधिक असलेल्या औषधांचे सेवन या कारणामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांभोवती म्युकरमायकोसिस या आजाराचा विळखा वाढला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ४४ रुग्णांची नोंद : १७ रुग्णांवर शस्त्रक्रिया : १४ वर उपचार सुरू

 अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत २० हजार रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात ४४ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन रुग्णांचा नागपूर, तर दोन रुग्णांचा गोंदिया येथे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. स्टेरॉइडचा अतिरिक्त वापर, जास्त काळ आयसीयूमध्ये वास्तव्यास असलेले रुग्ण, मधुमेह रुग्ण, ऑक्सिजनचा वापर करताना न घेतलेली योग्य काळजी, स्वत:च्या मनाने स्टेरॉइडचे प्रमाण अधिक असलेल्या औषधांचे सेवन या कारणामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांभोवती म्युकरमायकोसिस या आजाराचा विळखा वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळेच या आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेता आरोग्य विभागाने कोराेनामुक्त झालेल्या रुग्णांचे म्युकरमायकोसिसच्या आनुषंगाने सर्वेक्षण आणि आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,९४७ कोरोनाबाधित आढळले असून ४०,००६ बाधितांनी यावर मात केली आहे. यापैकी आतापर्यंत २० हजार कोरोनामुक्त झालेल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४४ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले, तर ३० संशयित रुग्ण आढळले आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. यापैकी आतापर्यंत १७ रुग्णांवर गोंदिया व नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर १४ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. म्युकरमायकोसिसने गोंदिया जिल्ह्यातील आतापर्यंत पाच रुग्ण दगावले असून, यापैकी तीन रुग्ण नागपूर येथे, तर दोन रुग्ण गोंदिया येथेच उपचारापूर्वीच दगावल्याची माहिती आहे.  

टास्क फोर्सकडून नियमित आढावा nम्युकरमायकोसिसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व वेळीच रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नेत्ररोग आणि शासकीय व खासगी ईएनटी तज्ज्ञ यांचा समावेश असलेल्यांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या टास्क फोर्सची दर आठवड्याला बैठक घेतली जात असून, त्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा सातत्याने आढावा घेऊन उपाययोजना केल्या जात आहे. 

एम्फोटिरिसिन बी इंजेक्शनचा पुरेसासाठा nम्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा जिल्ह्यात व राज्यात सुद्धा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत होती. मात्र शासनाकडून आता या इंजेक्शनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रुग्णांची अडचण दूर झाली आहे. शिवाय या आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सुद्धा समावेश केल्याने दिलासा मिळाला आहे. ओठ, नाक, जबड्याला लक्षणे दिसताच घ्या वेळीच काळजी nम्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, कोरोनातून बरे झालेल्या तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना या आजाराची लागण अधिक होते. या आजाराचा शिरकाव नाकावाटे होत असून, सायनस होऊन पुढे डोळ्यात आणि मेंदूपर्यंत पोहोचतो यामुळे बरेचदा डोळा आणि जबडा सुद्धा काढावा लागतो. 

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या