शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माझे कर्ज माफ झालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:22 IST

शेतकऱ्यांना अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटानेदेखील हैराण केले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

धामणगावात काँग्रेसचे आंदोलन : दीड हजार शेतकऱ्यांनी भरले फॉर्मलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांना अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटानेदेखील हैराण केले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य शासनाच्या फसव्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ स्थानिक तहसील कार्यालयासमोर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आ.वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. यावेळी तब्बल दीड हजार शेतकऱ्यांनी ‘माझे कर्ज माफ झाले नाही’ असे फॉर्म स्वहस्ताक्षरात भरून दिले. राज्य शासनाने घोषित केलेले तातडीचे १० हजार रूपयांचे कर्ज अद्याप कोणत्याही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. यातील जाचक अटींमुळे शेतकरी पुरते धास्तावले आहेत. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केलीत. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन सिंघवी, बाजार समितीचे माजी सभापती श्रीकांत गावंडे, जि.प.सदस्य वैशाली बोरकर, अनिता मेश्राम, सुरेश निमकर, प्रियंका दगडकर, पं.स.सदस्य सविता इंगळे, संगीता निमकर, प्रिती ढोबळे, युकाँचे विधानसभाध्यक्ष पंकज वानखडे, सच्चिदानंद काळे, नितीन कनोजिया, रमेश राठी, ऋषी जगताप, सलील काळे, प्रशांत सबाने, जि.प.चे माजी अध्यक्ष सतीश उईके, मोहन घुसळीकर, रंजना उईके आदी उपस्थित होते.