शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी कन्या भाग्यश्री’, अनेक बदलानंतर लागू

By admin | Updated: February 28, 2017 00:19 IST

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनादेखील आहे.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी योजना : गावासह बीपीएल कुटुंबांना लाभअमरावती : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यामध्ये ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजनादेखील आहे. आता योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या निकषासह राबविण्याचा निर्णय २२ फेब्रुवारीला आरोग्य विभागाने घेतला. मुलींचा जन्मदर अधिक असलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच बीपीएल कुटुंबासह असा सर्वसामान्य कुटुंबातील या योजनेचा लाभ मिळणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या शिक्षणापासून ते आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन मदत करते, ही योजना ‘सुकन्या’ नावाने १ जानेवारी २०१४ पासून सुरू करण्यात आली. मात्र या योजनेत अनेक मर्यादा होत्या. त्यामुळे यात बदल व काही निकषामध्ये सुधारणा करून २०१६ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अंमलात आणली. मात्र या योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वीच थांबविण्यात आली होती. आता मात्र योजनेच्या अनेक निकषात बदल करून ही योजना २२ फेब्रुवारीपासून राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासह सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात मुलींचे शिक्षण, आरोग्य यात सुधारणा करणे, बालिका भू्रणहत्या रोखणे, मुलींच्या जन्मदराबाबत, समाजात सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे, मुलांइतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे आदींसाठी सरकार प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात सरकारला यशदेखील येत आहे. मात्र आता या योजनेची व्याप्ती वाढवून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना नव्या रुपात अंमलात आणली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे गावागावांमध्ये मुलांपेक्षा मुलींचा टक्का वाढविण्यास मदत होणार आहे व मुलींचे प्रमाण ज्या गावात अधिक राहणार आहे, त्या गावांचा आरोग्य विभागाद्वारा गौरव करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आता पुढील आर्थिक वर्षापासून मिळणार आहे. (प्रतिनिधी)१८ वर्षांनंतर मुलींना मिळणार एक लाखया योजनेंतर्गत एक वर्षाच्या आत आरोग्य विभागाद्वारा २१ हजार २०० रुपये मुलीच्या नावे गुंतविणार आहे व मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार आहे. ही योजना प्रभावीपणे राबवावी, यासाठी संबंधित ग्रामपंचयतीला सरकार प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहे. ज्या गावात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण असेल, त्या ग्रामपंचायतीला पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. मुलीस मिळणाऱ्या एक लाखापैकी १० हजार रुपये मुलीच्या शिक्षणावर खर्च करणे बंधनकारक आहे. एपीएल, बीपीएल कुटुंबात दोन मुलीपर्यंत लाभया योजनेचा एपीएल व बीपीएल कुटुंबामध्ये पहिल्या दोन मुलींपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. तिसऱ्या अपत्यासाठी हा लाभ देय नाही. मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तिने इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र आवश्यकपहिल्या मुलीसाठी लाभ घेताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक नाही. मात्र, दुसऱ्या मुलीच्या लाभासाठी पालकांना हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ही योजना आधारशी जोडण्यात येणार आहे. तसेच बालगृहातील अनाथ मुलींसाठीही लागू आहे. मुलीचा १८ वर्षांची होण्यापूर्वीच मृत्यू झाल्यास योजनेचा फायदा तिच्या पालकांना मिळणार नसून, बँक खात्यात जमा होणारी रक्कम शासनजमा करण्यात येणार आहे.