शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुशिर हत्याकांड सीसीटीव्हीत कैद

By admin | Updated: November 5, 2015 00:30 IST

गांधी चौक मार्गावरील विलास सावजी यांच्या हॉटेलमधील सीसीटीव्हीत मुशिरसह चार जणांवर झालेला प्राणघातक हल्ला कैद झाला आहे.

सहावा आरोपींना अटक : तलवार, दोन चाकू , तीन दुचाकी जप्त अमरावती : गांधी चौक मार्गावरील विलास सावजी यांच्या हॉटेलमधील सीसीटीव्हीत मुशिरसह चार जणांवर झालेला प्राणघातक हल्ला कैद झाला आहे. याप्रकरणातील सहावा आरोपी दिनेश आठवले याला बुधवारी शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली असून हल्ल्यात वापरण्यात आलेली तलवार, चाकू आणि तीन दुचाकी पोलिसांनी वलगाववरून जप्त केली आहे. गांधी चौक मार्गावरील विलास सावजी यांच्या हॉटेलमध्ये आरोपी उमेश आठवलेसह पाच जणांनी जेवणासाठी वाद केला. हॉटेलमधील गोंधळ पाहून शेजारील प्रतिष्ठानाचे संचालक तनवीर आलमसह मुशिर आलम, जीया अहमद व बाबा ऊर्फ मकसूद आलम सावजीच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांनी माणुसकी दाखवूून हॉटेल मालक सावजी व उमेश आठवलेचे भांडण सोडविण्यासाठी गेले. मात्र, उमेश आठवलेसह अंकुश सुभाष जिरापूरे(२६), निलेश अशोक आठवले(२७) व शुभम तात्यासाहेब जवजांळ(३१) व राजु माडवे (२५,रा. सर्व राहणार माताखिडकी, महाजनपुरा) यांनी तनवीर आलमसह चारही जणांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुशिर आलम व जिया अहमद गंभीर जखमी झाले. सावजी यांच्या हॉटेलमधील सिसीटीव्हीत हा सर्व गोंधळ व उमेश आठवलेने केलेला प्राणघातक हल्ल्याचे चित्रीकरण झाले आहे. या हल्ल्यात गंभीर झालेल्या मुशिर आलमचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी तणावग्रस्त स्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने तत्काळ आरोपींचा शोध घेऊन पाच आरोपींना अटक केली. पाचही आरोपींना पोलिसांच्या कडकोड बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ७ नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची कसुन चौकशी सुरु आहे. बुधवारी सहाव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर आरोपी उमेश आठवलेसह पाच जण वलगाव येथे राहणाऱ्या सासूकडे गेले. तसेच त्याच्या घरामागील सर्व्हीस लाईनमध्ये तलवार व चाकू लपून ठेवल्याची कबुली आरोंपींनी पोलिसांना दिली. पोलिसांनी वलगाव जावून एक तलवार, दोन चाकू, तीन विना क्रमांकाच्या दुचाकी व रक्तांने माखलेले आरोपींचे कपडे जप्त केले.