शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

बँकेत ‘मसल पाॅवर’ वाढले, संचालकांना ‘व्हाईस’ नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची असताना गत ११ वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज न देता दलालांमार्फत ही रक्कम कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आली. बॅंकेत सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम केले असून, त्यांची ‘मसल पाॅवर’ वाढल्याने संचालकांना ‘व्हाईस’ नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी प्रवर्गातून बॅंकेत संचालकपदाचे उमेदवार संजय खोडके यांनी शुक्रवारी येथे केला. ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीच्या अनुषंगाने परिवर्तन पॅनेलचा जाहीरनामा जाहीर करताना ते बोलत होते. संजय खोडके यांच्या मते, बॅंकेची निवडणूक महत्त्वाची नाही, तर शेतकरी वाचला पाहिजे, तो जगला पाहजे, यासाठी ही लढाई आहे. पक्ष, विचार वेगवेगळे असताना जिल्ह्यातील विविध नेते शेतकऱ्यांची बॅंक वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत. बॅंकेच्या अध्यक्षांनी गडबड, घोटाळा केला, ही बाब वैधानिक ऑडिटमध्ये आता स्पष्ट झाली आहे. जिल्हा बॅंकेचा कारभार एवढा रसातळाला गेला की, नाबार्डच्या मुद्द्यांवरूनच बॅंक बरखास्त होईल, अशी स्थिती आहे. बॅंकेत शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख बघितल्यास खरेच कोण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, हे दिसून येते. बॅंकेवर प्रशासक नेमताच शेतकरी कर्ज वाटपाचा आलेख वाढला, असेही खोडके यांनी सांगितले. बॅंकेचे अध्यक्षांना ईडीची नोटीस आल्याच्या प्रश्नावर संजय खोडके यांनी ‘ईडीचा ऊहापोह नको’ असे म्हणत याविषयी बोलणे टाळले. मात्र, बॅंकेत अपहार, भ्रष्टाचार झाला, हे कुणीही लपवू शकत नाही, याला त्यांनी दुजोरा दिला. आता बॅंकेत गैरव्यवहारांच्या चौकशीचे सत्र सुरू झाले असून, दोषींना त्यांचे कर्म एक दिवस दिसून पडेल, असे संजय खोडके म्हणाले. बॅंकेच्या गैरव्यवहाराला संचालक नव्हे तर अध्यक्षच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी  केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत संचालकांची सभा पाच मिनिटांत गुंडाळली जाते, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल, असा सवालही खोडके यांनी उपस्थित केला. यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू, भाजपचे नेते, माजी आमदार अरुण अडसड, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री वसुधा देशमुख, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, आमदार राजकुमार पटेल, राजेश वानखडे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र महल्ले, माया हिवसे, रवींद्र गायगोले, सुधीर सूर्यवंशी, जयश्री देशमुख उपस्थित होते.

दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसडजिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला. 

बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: देशमुखजिल्हा बँकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा कारभार हा शेतकऱ्यांसाठी असावा, यासाठी ही लढाई आहे. भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :bankबँकBacchu Kaduबच्चू कडू