शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST

काठीने जोरदार प्रहार, साडी पेटविली, कुष्टा खुर्द येथील घटना परतवाडा : शेजारी राहणाऱ्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने ...

काठीने जोरदार प्रहार, साडी पेटविली, कुष्टा खुर्द येथील घटना

परतवाडा : शेजारी राहणाऱ्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या शरीरावर बांबूच्या काठीने घराबाहेर व घरात जोरदार प्रहार करीत तिची हत्या केली. अचलपूर तालुक्यातील कुष्टा खुर्द येथे शनिवारी रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने तालुक्यातील ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गौतम गायकवाड (३०, रा. कुष्टा खुर्द) असे आरोपी पतीचे व प्रिया गायकवाड असे मृत पत्नीचे नाव आहे. पथ्रोट पोलिसांनी राहुलला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रिया ही अमरावती महानगरपालिका अंतर्गत दस्तुरनगर आरोग्य केंद्रात आशा वर्कर होती, तर राहुल हा मजुरी करतो. त्याने दोन महिन्यांपूर्वी गावातीलच समाजमंदिरात अमरावती येथे प्रियाशी लग्न केले होते. आधीच विवाहित असलेल्या प्रियाला दोन मुले आहेत. अमरावती येथे दोघांचा परिचय झाला होता.

लग्नानंतर राहुल व प्रिया कुष्टा खुर्द येथे राहत होते. शेजारच्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय राहुल वारंवार व्यक्त करीत होता. त्यावरून झालेल्या वादावादीत शनिवारी सायंकाळी त्याने तिला घराबाहेर काढून बांबूच्या काठीने डोक्यावर व हातापायावर मारहाण केली. त्याचा राग येथेच संपला नाही, तर घरात नेऊन पुन्हा मारहाण केली. मध्यरात्री या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

बॉक्स

घरात नेऊन साडी पेटविली

राहुलने काठीने मारहाण करीत प्रियाला घरात नेले व तिची साडी पेटविली. या मारहाणीबाबत कळताच पोलीस पाटील सविता धनराज गोंडचोर यांनी या घटनेची फिर्याद पथ्रोट पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, महिला दगावल्याचे आढळून आले. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत.

बॉक्स

घरातच होता आरोपी

दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीची हत्या केल्यानंतर राहुल हा घरातच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने मारहाणीत प्रियाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले.

कोट

दोन महिन्यांपूर्वी लग्न करून आणलेल्या पत्नीची काठीने मारून हत्या करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

- सचिन जाधव, ठाणेदार, पथ्रोट