शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

खून, बलात्कार, घरफोड्यांनी गाजले सरते वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

अमरावती : खून, बलात्कार, घरफोड्या, चोऱ्या तसेच खुनाचा प्रयत्न अशा घटनांनी २०२० हे सरते वर्ष गाजले. गत ११ महिन्यांत ...

अमरावती : खून, बलात्कार, घरफोड्या, चोऱ्या तसेच खुनाचा प्रयत्न अशा घटनांनी २०२० हे सरते वर्ष गाजले. गत ११ महिन्यांत शहरात खुनाच्या २२ घटना घडल्या, तर खुनाच्या प्रयत्नाच्या ६५ घटना पुढे आल्या आहेत. महिलांवरील लैगिंक अत्याचाराच्या ६९ घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन अल्पवयीन मुलांनी एका युवकाला चाकूने भोसकल्याची घटना ताजी आहे. दोन आठवड्यांपूर्वी एका डॉक्टरने महिलेवर कारमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. यंदा दरोड्याची एक घटना घडली, तर जबरी चोरीच्या ६५ घटना पुढे आल्या. घरफोडीच्या घटनांत वाढ होऊन यंदा २०४, चोरी ७६६, मोटर वाहन चोरी ३०१, गैरकायद्याची मंडळी जमवून गुन्हा ६८, विश्वासघात १३, फसवणूक १२८, पळवून नेणे ७६, दुखापत ६२३, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला २३, विनयभंग २६८, मोटार वाहन अपघातात मृत्यू ६९, गंभीर व किरकोळ अपघात १७७ तसेच पती व सारसरच्या मंडळीकडून महिलांचा छळ (४९८ अ) संबंधी ६९ घटना घडल्या आहेत.

बॉक्स:

दीड महिन्याचा चिमुकला विहिरीत आढळला

एकनाथपुरम् परिसरातील न्यू प्रभात कॉलनीतील पोलीस पित्याच्या घरी माहेरी आलेल्या एका महिलेच्या दीड महिन्याच्या बाळाचे अपहरण व दुसऱ्या दिवशी घराच्या परिसरात असलेल्या विहिरीत आढळलेला त्याचा मृतदेह या प्रकरणात मातेला राजापेठ पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण शहरात सर्वाधिक चर्चेत राहिले. आईला अटक झाली तरी तिने पोलिसांना खुनाची कबुली दिलेली नाही. त्यामुळे बाळाचा खून कुणी व का केला, याचे गूढ अद्यापही कायम आहे.

बॉक्स:

डॉक्टरने केला बलात्कार

फॅमिली डॉक्टरनेच उपचाराकरिता येणाऱ्या महिलेला एसआरपीएफ क्वार्टरनजीक कारने नेऊन गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. त्यानंतर डॉक्टरला फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण सर्वाधिक चर्चेत आले. याच ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर भानखेडा मार्गावरील शेतात तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण दोन महिन्यांपूर्वी घडले होते.

बॉक्स:

बत्त्याने ठेचून भावाची हत्या

बत्त्याने ठेचून बहिणीने धाकट्या १० वर्षीय भावाची हत्या केल्याची घटना खोलापुरीगेट ठाण्याच्या हद्दीत चार महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी बहिणीला अटक केली. ताई, तू घरून निघून जाऊ नको, असे भावाने म्हणताच तिचा राग अनावर झाला. त्यानंतर तिने हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.

बॉक्स

सुवर्णकारांच्या घरी जबरी चोरी

राजापेठ ठाण्याच्या हद्दीत माधवनगरातील सुर्वणकाराच्या घरी पती-पत्नीवर चाकूने हल्ला चढवून लाखो रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने सिने स्टाईल चोरून नेल्याची घटना दीड महिन्यांपूर्वी घडली. या घटनेचा सुगावा जरी पोलिसांना लागला असला तरी मुख्य आरोपीपर्यंत अद्याप राजापेठ पोलीस पोहोचली नाहीत.

१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर ११ महिन्यांतील गुन्हे

२०१९ चे गुन्हे २०२० चे गुन्हे

खून २५ २२

खुनाचा प्रयत्न ५८ ६५

बलात्कार ७६ ६९

दरोडा ५ १

जबरी चोरी ५८ ६५

घरफोडी १५९ २०४

चोरी ७९६ ७६६

विनयभंग २७३ २६८