शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिराळानजीक ढाबा मालकाची हत्या

By admin | Updated: June 3, 2014 23:44 IST

साऊर ते शिराळा मार्गावरील एका ढाबा मालकाची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

संशयित ताब्यात : क्षुल्लक वादातून हत्या झाल्याचा संशयटाकरखेडा (संभू) : साऊर ते शिराळा मार्गावरील एका ढाबा मालकाची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही हत्या क्षुल्लक कारणावरुन झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.शिराळा नजीकच्या कळमगव्हाण येथील राजेंद्र नारायण रोंघे ( ४८), असे मृताचे नाव आहे. साऊर ते शिराळा मार्गावरील कळमगव्हाण येथून दोन किमी अंतरावरील बाबूराव मानकर यांच्या शेतात ढाबा चालवित होते. राजेंद्रच्या हत्येप्रकरणी प्रवीण तुळशिदास कडू (३४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ढाबा मालकाच्या हत्येचे गूढ कायमपोलीस माहितीनुसार, बाबूराव मानकर यांच्या मालकीच्या शेतातील ढाबा चार महिन्यांपूर्वी राजेंद्र रोंघे यांनी चालविण्यास घेतला होता. सोमवारी रात्री ११.३0 वाजता ढाब्यावरुन दोन ग्राहक जेवण करुन गेले. त्यावेळी या ढाब्यावर राजेंद्र रोंघे, त्यांचा मुलगा राहुल (२१) व शेजारी प्रवीण कडू असे तिघे जण होते. रात्री राहुलने ढाब्यावर झालेल्या व्यवसायाची रक्कम सोबत घेतली व प्रवीण कडू याला राजेंद्रसोबत ढाब्यावर राहण्याबाबत सांगून निघून गेला. राजेंद्रच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने त्यांचा परिवार प्रवीणच्या घरीच राहत आहे. रात्री १ वाजताच्या सुमारास प्रवीण हा घरी आला व त्याने हात, पाय व चेहरा धुतला. याचवेळी राजेंद्रची पत्नी रत्नाबाई यांना जाग आली. त्यांनी प्रवीणला का आला म्हणून विचारणाही केली. परंतु ढाब्यावर आपल्याला झोप येत नसल्याचे कारण सांगून त्याने वेळ मारुन नेली.मंगळवारी सकाळी ८ वाजता राजेंद्रचा मुलगा राहुल हा ढाब्यावर गेला असता ढाब्यासमोर त्याच्या वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. घाबरलेल्या स्थितीत राहुल पुन्हा गावात आला व त्याने वडीलांच्या स्थितीची माहिती आपल्या परीवाराला दिली. सार्‍यांनीच घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. वलगावचे ठाणेदार शिरीष राठोड यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून तपासाला प्रारंभ केला. विटा डोक्यावर मारुन गंभीर जखमी करण्यात आले व अतिरक्तस्त्राव झाल्याने राजेंद्रचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमनाथ गार्गे, सहायक पोलीस आयुक्त तडवी यांनीही पोलीस ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. (वार्ताहर)