शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

वरूड येथे दगडाने ठेचून युवा मूर्तिकाराची हत्या

By admin | Updated: September 30, 2016 00:20 IST

स्थानिक आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास एका तरूण मूर्तिकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

आठवडीबाजारातील घटना : आरोपीला अटक, गमतीचा विपर्यास भोवलावरूड : स्थानिक आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास एका तरूण मूर्तिकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी घडली. वरूड पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मृताचे नाव गजानन गणेशराव बेदरकर (३७,रा.वरुड) तर आरोपीचे नाव विकी प्रभाकर कोहळे (२०,रा. आठवडीबाजार, वरूड) असे आहे. मृत गजानन बेदरकर आणि आरोपीचे मैत्रीचे संबंध होते. बुधवारी रात्री ११.३० वाजता गजानन बेदरकर हे आठवडी बाजारात गेले असता त्यांना तेथे विकी कोहळे भेटला. दोघांमध्ये थट्टामस्करी सुरू झाली. थट्टामस्करीचे रूपांतर वादात झाले. वाद विकोपाला गेला आणि आरोपी विकी कोहळे याने गजानन बेदरकर यांच्या डोक्यावर दगडाने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती वरूड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताला ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी रात्रीच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपी विकी कोहळेविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गवई, ठाणेदार गोरख दिवे यांनी भेट देऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी विकीने केवळ थट्टा मस्करीतून ही हत्या केली की यामागे पूर्ववैमनस्याचा प्रकार आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. युवा कलावंताच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)उत्कृष्ट कलावंत होता गजानन मृत गजानन बेदरकर हा शहरातील एक उत्तम कलावंत होता. त्याने घडविलेल्या मूर्तींना गणेशोत्सव, दुर्गोत्सवासह इतरवेळीदेखील प्रचंड मागणी राहात असे. शिवाय तो कुटुंबातील एकमेव कर्ता पुरूष होता. त्याच्या आकस्मिक व धक्कादायक मृत्यूमुळे त्याचे कुटुंब वाऱ्यावर आले आहे. शिवाय शहरातही या गुणी कलावंताच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. मूर्तिकारांमध्ये हळहळगणेशोत्सवादरम्यान मूर्तिकार गजानन याने अनेक सुरेख मूर्तींंची निर्मिती केली होती. नवदुर्गोत्सव तोंडावर असल्याने तो दुर्गेच्या मूर्ती घडविण्यात व्यस्त होता. त्यामुळे त्याच्या निधनाने समव्यावसायिक हळहळले. आरोपी विकी प्रभाकर कोहळे व मृत गजानन गणेश बेदरकर हे चांगले मित्र होते. आठवडीबाजारात त्यांच्यामध्ये थट्टा-मस्करी सुरू असताना अचानक वाद उद्भवला असावा. याच वादात संताप अनावर होऊन अकस्मात विकीच्या हातून गजाननचा खून झाला, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेमागे दुसरे कारण तर नाही, ना याचा शोध घेतला जात आहे. - गोरख दिवे, ठाणेदार, वरूड