शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

जबरी चोरीनंतर अपंग वृद्धेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:46 IST

वलगाव रोडवरील हजरत बिलालनगरातील एका घरात रविवारी दुपारी जबरी चोरीनंतर वृद्ध महिलेची तोंड दाबून व गळा आवळून हत्या करण्यात आली. घरातून सोन्याचा अडीचशे ग्रॅ्रमचा ऐवज व ८३ हजारांची रोकड लंपास झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देहजरत बिलालनगरात भरदुपारची घटना : सात लाखांचा ऐवज लंपास

तोंड दाबून गळा आवळलालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वलगाव रोडवरील हजरत बिलालनगरातील एका घरात रविवारी दुपारी जबरी चोरीनंतर वृद्ध महिलेची तोंड दाबून व गळा आवळून हत्या करण्यात आली. घरातून सोन्याचा अडीचशे ग्रॅ्रमचा ऐवज व ८३ हजारांची रोकड लंपास झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.ताहेरा बानो अदील अहमद (६०, रा. हजरत बिलालनगर) असे मृताचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी रात्री ८ च्या सुमारास अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३९२ (लुटपाट), ३९४ (जबरी चोरी), ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा नोंदविला. वलगाव रोडवर मीठ कारखान्यामागे हजरत बिलालनगरात ताहेरा बानो या पती हाजी अदील अहमद यांच्यासोबत वास्तव्यास होत्या. हे दाम्पत्य अपंग आहे. दोन्ही मुलींच्या लग्नानंतर घरात दोघेच होते. अदील यांची पुतणी सौदी अरबला जाणार असल्याने पाहुणचाराच्या तयारीला ताहेरा बानो लागल्या होत्या. अदील हे घरापासून काही अंतरावरील रेशन दुकान सांभाळत होते.रात्री उशिरा शवविच्छेदनअदील यांच्याकडे घरकाम करणारी नुसरत परवीन शेख अब्रशर (४५, रा. धरमकाटा) कामासाठी दुपारी १.३० वाजता गेली असता, तिला ताहेरा बानो फरशीवर पालथ्या पडलेल्या दिसल्या. त्यांच्या नाकातोंडातून रक्त निघत होते. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ अदील यांना दिली. घटनेच्या माहितीवरून नागपुरी गेट व गाडगेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला असता, घरातील बेडरूममधील आलमाऱ्या उघड्या व साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले. त्यामुळे दरोड्यानंतर विरोध करणाऱ्या ताहेरा बानो यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. त्यांनी सर्वप्रथम घरात गेलेल्या नुसरत परवीन यांची चौकशी केली तसेच अदील यांच्या अन्य काही नातेवाइकांचे बयाण नोंदविले. पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. भरदिवसा दरोडा व हत्या करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भय व्याप्त होते.दरम्यान, ताहेर बानो यांची तोंड दाबून व गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात पुढे आले आहे. रविवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अमित क्षार यांनी ताहेर बानो यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.मोलकरणीचे बयाण नोंदविलेपाहुणचार असल्याने अदील यांच्याकडे घरकाम करणारी नुसरत परवीन हिला लवकर बोलाविले होते. रविवारी दुपारी १.३० वाजता नुसरत पोहोचली. तिला दार उघड दिसले. स्वयंपाकगृहात ताहेरा बानो फरशीवर पालथ्या पडून होत्या. तिने घटनेची माहिती अदील यांना दिली. त्यानंतर ताहेरा यांना तात्काळ डॉ. सोहेब बारी यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना अन्य एका खासगी रुग्णालयात नेऊन घरी परत आणले, असे बयाण नुसरतने पोलिसांना दिला. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.

टॅग्स :Murderखून