शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रिंग ठेकेदाराची मित्रानेच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:11 IST

तहसीलच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर कार्यरत सेंट्रिंग ठेकेदार आलोककुमार यादव याचा मित्रानेच खून करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले. आर्थिक देवाणघेवाण व मान-अपमानावरून ही हत्या झाली.

ठळक मुद्देअपमानाचा वचपा : रॉडने डोक्यावर प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तहसीलच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर कार्यरत सेंट्रिंग ठेकेदार आलोककुमार यादव याचा मित्रानेच खून करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले. आर्थिक देवाणघेवाण व मान-अपमानावरून ही हत्या झाली. कुलदीपकुमार यादवने वरूड पोलिसांना खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, दुसऱ्याची चौकशी सुरू आहे.पोलीस सूत्रानुसार, मृत आलोककुमार रमाकांत यादव (२८, रा. लालकुवा टिकरी जि. उन्नाव) हा या बांधकामावर सेंट्रिंग ठेकेदार होता. त्याच्या सोबतीला दोन युवक होते. ७ मे रोजी भूमिअभिलेख कार्यालयाच्या सेप्टिक टँकमधून त्याचा कुजलेला मृतदेह वरूड पोलिसांनी बाहेर काढला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांनी घटनास्थळी शवविच्छेदनादरम्यान डोक्यावर रॉडने मारल्याचे तर मानेवर चाकूने कापल्याचे अहवालात नमूद केले.पोलिसी खाक्याने कुलदीपला केले बोलतेवरूड : पोलिसांनी मृत आलोककुमारचा साहाय्यक असलेला कुलदीपकुमार यादव नामक युवकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. तो, मृत आलोककुमार व अन्य सहकारी राहुलकुमार यादव हे एकाच गावचे. आलोककुमार त्यांना मदतनीस म्हणून वागणूक देत होता. काम करायचे नसेल, तर पैसे देऊन तुम्ही निघून जा, असेही त्याने या दोघांना बजावले होते. त्यामुळे राग अनावर होऊन कुलदीपकुमारने डोक्यावर रॉड मारून आलोककुमारला गंभीर जखमी केले व नंतर गळा कापून खून केला. यानंतर मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून देण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याचा सहकारी राहुलकुमार यादव यालासुद्धा पथकाने पकडून आणले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे.खुनाचा गुन्हा दाखलवरूड पोलिसांनी कुलदीपकुमार यादव याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोरख दिवे, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगाडे, एएसआय सुरेश गावंडे, शशिकांत पोहरे, कॉन्स्टेबल श्रीकांत खानंदे, रविकांत धानोरकर, सचिन भाकरे, उमेश ढेवले, विक्रांत कोंडे करीत आहेत.

टॅग्स :Murderखून