शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने भोसकून खून; दोघांना सश्रम जन्मठेप

By प्रदीप भाकरे | Updated: January 31, 2024 17:53 IST

अमरावती - एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या दोघांना सश्रम जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ...

अमरावती - एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या दोघांना सश्रम जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना ३१ जुलै २०२० रोजी रात्री गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शोभानगर येथे घडली होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी हा निर्णय दिला. सागर गजानन खरड (२८) व धीरज ऊर्फ गोलू विश्वास ठाकरे (३१, दोघेही रा. शोभानगर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पंकज गोकुल सिडाम (२६, रा. शोभानगर) असे मृताचे नाव आहे.

न्यायालयीन दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी ३१ जुलै २०२० रोजी रात्री १०:३० वाजता पंकज हा पुडी घेऊन येतो, असे म्हणून घरून निघाला. मार्गात एका दुकानाजवळ त्याचा सागर व धीरजसोबत वाद झाला. या वादात धीरजने पंकजला तुला चाकूने मारतो, अशी धमकी दिली. त्यानंतर धीरज व सागर तेथून निघून गेले. काही वेळाने ते दोघेही तेथे परतले. यावेळी सागर व धीरजने पंकजला पकडून खाली पाडले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पंकजला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मृतक पंकजच्या बहिणीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात न्या. एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयात १४ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयाने आरोपी सागर व धीरजला सश्रम जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मंगेश श्रीधर भागवत यांनी यशस्वी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून देवराव डकरे व पोलिस कॉन्स्टेबल अरुण हटवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Amravatiअमरावती