लोकमत न्यूज नेटवर्क.अमरावती : रात्रीच्या सुमारास एमआयडीसीतील कारखान्याच्या गेटपर्यंत सोडण्याचे पन्नास रुपये जादा मागणाऱ्या ऑटोरिक्षाचालकाची एका प्रवाशाने डोक्यावर लोखंडी रॉड मारून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री १ च्या सुमारास नांदगाव पेठ एमआयडीसीत घडली.पोलीस सूत्रानुसार, सागर सरदारसिंह ठाकूर (४० रा. एसटी स्टॅन्डजवळ, नांदगाव पेठ) असे मृताचे नाव आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी अमोल विश्वनाथ वानरे (३८, रा. छाया कॉलनी, अमरावती) याला अटक केली आहे. सागर व त्यांचा मित्र धीरज कोठार हे शुक्रवारी रात्री बस स्टँडवर प्रवाशांची प्रतीक्षा करीत होते. साडेबाराच्या सुमारास दोन प्रवासी ऑटोरिक्षाजवळ आले आणि त्यांनी एमआयडीसी स्टॉपपर्यंत सोडण्यास सांगितले. दीडशे रुपये भाडे ठरले. सागरने दोन्ही प्रवाशांना नियोजित स्थळी सोडले. मात्र, त्यांनी एस.के. इंडस्ट्रीजसमोर सोडून देण्याची मागणी केली. त्यासाठी ५० रुपये अतिरिक्त द्यावे लागेल, असे सागरने सांगताच ते कबूल झाले. मात्र, उतरत असताना दीडशे रुपये हाती दिले. सागरने पन्नास रुपयांची मागणी केली असता, त्यांनी त्याच्याशी वाद घातला. यादरम्यान आरोपी अमोलने काही अंतरावर जाऊन लोखंडी रॉड आणला आणि त्याचा सागरच्या डोक्यावर प्रहार केला. तो जागीच गतप्राण झाला. हा प्रकार पाहून सागरसोबत असलेला धीरज एका झुडपात लपला. त्याचा आरोपी अमोलने शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही. सकाळी सावर्डी येथील पोलीस पाटील नरेश मेश्राम यांनी नांदगाव पेठ पोलिसांना दिली. ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मृताचा भाऊ साजन ठाकूर याच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.ऑटोचालक संघटनांच्या रोषामुळे तणावकाशीनाथ महाराज ऑटो युनियन आणि आक्रमण ऑटो युनियनच्या सदस्यांसह नागरिकांनी नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून परप्रांतीयांना हाकलून लावण्याची तसेच मृताच्या नातेवाइकांना आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली. यानंतर काही जण जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. कारवाई करा, अन्यथा मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता.कुटुंबीयांचा धारवड गेलासागर ठाकूर यांंच्या पश्चात पत्नी आणि श्रेया (११) व सुमीत (६) ही मुले आहेत. सकाळी आईसोबत श्रेया हसत खेळत शाळेत गेली. मात्र, परत आल्यावर तिचे हसणे अश्रूत बदलले. या हृदयद्रावक घटनेने समाजमन गहिवरले.
पन्नास रुपयांसाठी ऑटोचालकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST
सागरने पन्नास रुपयांची मागणी केली असता, त्यांनी त्याच्याशी वाद घातला. यादरम्यान आरोपी अमोलने काही अंतरावर जाऊन लोखंडी रॉड आणला आणि त्याचा सागरच्या डोक्यावर प्रहार केला. तो जागीच गतप्राण झाला. हा प्रकार पाहून सागरसोबत असलेला धीरज एका झुडपात लपला. त्याचा आरोपी अमोलने शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही.
पन्नास रुपयांसाठी ऑटोचालकाची हत्या
ठळक मुद्देआरोपीला अटक : एमआयडीसीमधील घटना, नांदगाव पेठ हद्दीत तणावसदृश स्थिती