शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

आॅनलाईन नामांकनासाठी महापालिका हेल्पफुल !

By admin | Updated: January 13, 2017 00:04 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

मदत कक्षाची उभारणी : ‘एआरओं’कडे जबाबदारीअमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महापालिका स्तरावर एक किंवा त्यापेक्षा अधिक मदतकक्ष स्थापन करण्यात येणार आहे. आयुक्त हेमंत पवार यांनीही जबाबदारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३ वर सोपविली आहे. याशिवाय सातही झोनमधील ‘रिटर्निंग आॅफिसर’ आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरून देण्यास मदत करतील.यासाठी सायबर कॅफे व कम्युनिटी फॅसिलिटेशन सेंटरची मदत घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना शपथपत्रे स्टॅम्प पेपरवर सादर करण्याची गरज नाही. नामांकन संगणक प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध असली तरी अर्ज मागे घेण्यासाठी संगणक प्रक्रियेची गरज नाही. याशिवाय उमेदवारी अर्जासोबत जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पावती किंवा अन्य पुरावा देण्याची मुभा देण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)तीन पथक कार्यान्वितनिवडणूक निर्णय अधिकारी हेमंत पवार यांनी गुरुवारी व्हिडिओग्राफी सर्व्हायलंस पथक, भरारी पथक आणि चेकपोस्ट पथक कार्यान्वित केले. हे पथक सभा, बैठकी, मेळावे, पैसा, मद्यवाहतूक, मिरवणूक, आचारसंहिता अंमलबजावणीची देखरेख करतील. यातीनही पथकांवर स्वतंत्र जबाबदारी दिली आहे. भरारी पथकामध्ये महापालिका अधिकाऱ्यांसह पोलीस, आरटीओ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एक-एक प्रतिनिधी असेल. याशिवाय आचारसंहिता उल्लंघन व अन्य तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘कंट्रोल रुम’ स्थापित करण्यात येणार आहे.