शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:18 IST

झोन क्र.२ मधील उपअभियंता सुहास चव्हाण यांना नगरसेविकेच्या मुलाने केलेल्या मारहाणीचा निषेध म्हणून

मारहाण प्रकरण : कर्मचाऱ्यांचा संप चर्चेनंतर संपुष्टातलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : झोन क्र.२ मधील उपअभियंता सुहास चव्हाण यांना नगरसेविकेच्या मुलाने केलेल्या मारहाणीचा निषेध म्हणून महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. १९ जुलैला चव्हाण यांना भाजपच्या नगरसेविका जयश्री डहाके यांचा मुलगा अंकुश डहाके याने मारहाण केली होती. त्याबाबत बुधवारीच डहाकेविरूद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, त्यानंतर अंकुश डहाकेला अटक करण्यासह जयश्री डहाके आणि नगरसेवक प्रदीप हिवसे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले. गुरूवारी तर आंदोलनकर्त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आमसभेवरच बहिष्कार घातला. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते. महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या राजकीय दडपणशाहीचा तीव्र निषेध केला. उपायुक्तद्वय महेश देशमुख व नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, सहायक आयुक्त, योगेश पिठे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, पशूशल्य चिकित्सक सुधीर गावंडे, सचिन बोंद्रे, विधि अधिकारी श्रीकांत चव्हाण, सहायक आयुक्त मंगेश वाटाणे व सुनील पकडे, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, दुर्गादास मिसाळ, अजय जाधव, प्रमोद येवतीकर यांच्यासह बांधकाम, उद्यान, कर, झोन कार्यालय व महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.